
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ केंद्र देगलूर येथे 73 वा प्रजासत्ताक उत्साहात साजरा.करण्यात आले देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी त्याग करणारे स्वातंत्र्यसैनिक क्रांतिकारक व देशभक्तांना विनम्र अभिवादन करण्यात आले प्रसाद दस कामगार कल्याण अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून श्री रमाकांत मोतेवार सर सेवानिवृत्त शिक्षक तसेच अध्यक्ष अरुण पांचाळ साहेब बांधकाम व्यवसायिक तथा बिल्डर यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम करण्यात आले.
तसेच अरुण पांचाळ साहेब यांनी स्वखर्चाने कामगार व कामगार कुटुंबीयांना वह्या पेन मास वाटप करण्यात आले. तसेच कार्यक्रमासाठी विशेष अतिथी म्हणून स्वतंत्र सैनिक यांची मुलगी श्रीमती गोदावरी ताई मिठे वार तसेच योगेश गन वार संजय स्वामी क्युम शेख छोटू शेख जहीर मामू राजू पाटील गोरेगावकर शिवराज बुक्कावर शिवणीकर सोमनाथ स्वामी गंगाधर महिला गिरे तसेच कामगार कल्याण केंद्र देगलूर येथे येथे चालणारे अनेक योजनांची कल्याणकारी योजनेचे अनेक माहिती देण्यात आले. याप्रसंगी केंद्राचे कर्मचारी बिरादार मॅडम महानंदा मॅडम व्ही बी स्वामी केंद्राचे सभासद यांच्या उपस्थितीत ध्वजारोहण कार्यक्रम अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाला.