
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
नांदेड :- आज 26 जानेवारी रोजी दैनिक चालू वार्ताचा ऑफलाइन पहिला अंक निघाला असून तो आज नांदेड उत्तरचे लोकप्रिय आमदार बालाजी दादा कल्याणकर यांना दिला असता त्यांनी मुख्य संपादक डी .एस. लोखंडे पाटील आणि दैनिक चालू वार्ताच्या सर्व टीमचे मन भरून कौतुक केले कमी कालावधीमध्ये दैनिक चालू वार्ता हा पेपर खूप प्रगती करत आहे असे म्हणत दैनिक चालू वार्ता हा पेपर नांदेडमध्ये दररोज वाचकासाठी निघावा अशा शुभेच्छा दिल्या. पेपरचे नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी समर्थ लोखंडे यांना वैयक्तिक शुभेच्छा देत आपण दैनिक वार्ताच्या माध्यमातून समाजाच्या अनेक समस्या सोडवत असल्याबद्दल आपले व आपल्या पेपर मधील सर्व समूहाचे आभार मानले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.