
दैनिक चालु वार्ता
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादराव लोखंडे
नांदेड दिनांक 26 :- जानेवारी श्री निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेत 73 वा गणतंत्र दिवस साजरा करण्यात आला प्रारंभी शाळेच्या सहसचिव मा डॉ सौ एस एन राऊत मॅडम यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जि प हायस्कूलचे निवृत्त माजी मुख्याध्यापक श्री साखरे सर, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर, प्राथमिक माध्यमिक शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी, परीसरातील नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.
ध्वजारोहण नंतर कोविड नियमांचे पालन करुन झालेल्या कार्यक्रमात, संस्थेच्या सहसचिव मा डॉ सौ एस एन राऊत मॅडम यांनी अध्यक्षीय समारोप करताना सर्वांना गणतंत्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री यशवंत थोरात सर, श्री प्रकाश कळकेकर सर, श्री सुदर्शन कल्याणकर सर यांची मार्गदर्शनपर भाषणे झाली. यावेळी मतदार जागृती अभियानांतर्गत जिल्हाधिकारी यांनी घेतलेल्या स्पर्धे मध्ये द्वितीय क्रमांक मिळविलेल्या इयत्ता 10 वी ची विद्यार्थ्यींनी कु. अंकिता तात्याराव इंगोले हीचा सत्कार अध्यक्षांच्या हस्ते करण्यात आला.
सूत्रसंचालन श्री प्रल्हाद आयनेले सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री शिवाजी माळेगावे यांनी मानले. कार्यक्रमा नंतर सहसचिव व मुख्याध्यापकांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाला श्री निकेतन प्राथमिक व माध्यमिक शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षिका शिक्षेकेत्तर कर्मचारी, परीसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी उपस्थित होते.