
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- येथील परमपूजनीय गोळवलकर गुरुजी विद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सुरेंद्रभाऊ आलुरकर (केंद्रीय अध्यक्ष), मा.नरुअण्णा पोलावार(स्थानिक कोषाध्यक्ष), गिरीश गोळे(स्थानिक सहकार्यवाह ), अनुराधा गोळे(स्थानिक सदस्य),चंद्रकांत रेखावार(स्थानिक उपाध्यक्ष), प्रकाश चिंतावार(अध्यक्ष शालेय समिती) ,भागवत तम्मेवार (स्थानिक सदस्य) ,अनुप कोटगिरे (स्थानिक सदस्य) व विद्यालयाचे मुख्याद्यापक देगावकर दमन, कोपले अंनतराम यांची उपस्थिती लाभली.
सुरुवातीला मान्यवरांच्याहस्ते प्रतिमेचे पूजन करण्यात आले व मा.सुरेंद्रजी आलूरकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यानंतर विद्यालयाच्या सहशिक्षिका सुरशेटवार अर्चना यांनी २६ जानेवारी का साजरी करतात तसेच दिल्ली येथील पथसंचलन – शक्ती, संस्कृती, एकात्मता यांचे सादरीकरण कशा पद्धतीने करतात याविषयी माहिती सांगितली.अध्यक्षीय समारोपात डॉ.आलूरकर भाऊ यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे कार्यक्रम कसा साजरा केला गेला पाहिजे,विद्यार्थ्यांच्या लसीकरणाविषयी मार्गदर्शन केले व प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बेजगमवार सविता, पद्य तोटावार सुरेखा यांनी सादर केले.या कार्यक्रमस शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी उपस्थित होते.