
दैनिक चालु वार्ता
मुखेड प्रतिनिधी
संघरक्षित गायकवाड
मुखेड :- प्रजासत्ताक दिन अमृत महोत्सव २६ जानेवारी प्रजासत्ताक दिना निमित्त जि प के प्रा शाळा हंगरगा पक येथे कोरोना चे नियम पाळुन सकळी ठिक ८ :०५ वाजता शाळेचे मुख्याध्यापक श्री मेतलवाड सर यांच्या हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम पारपाडण्यात आला तत्पुर्वी शासन आदेशाप्रमाणे संविधानात उद्देशिकेचे वाचन घेण्यात आले. त्यानंतर शाळेतील विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्थेसाठी मैदानात मॅट घातला.
सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप केले या प्रसंगी गावातील सर्व प्रतिष्ठीत शिक्षण प्रेमी नागरीक , सरपंच , उपसरपंच , चेअरमन श्री भीमराव दस्तुरे पाटील , बालाजी पताळे ,प्रा आरोग्य केंद्र डॉ सुप्रिया मॅडम , श्री पाटील सर, सिगंनवाड सर, पोलीस पाटील , तंटामुक्त अध्यक्ष, सदस्य , आजी माजी सर्व पदाधिकारी शाळेचे शिक्षक व अंगणवाडी कर्मचारी उपस्थित होते. शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला शेवटी कार्यक्रमाचे आभार श्री पाटील सर यांनी केले .