
दैनिक चालु वार्ता
खंडाळी सर्कल प्रतिनिधी
राठोड रमेश
खंडाळी :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खरकाडी तांडा येथे 73 वा प्रजासत्ताक दिन कोविड -19 चे सर्व नियम पाळून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पंडित हरीचंद्र राठोड व तसेच प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री चोले सर व शाळेतील निवडक विद्यार्थी उपस्थित होते.
सर्वप्रथम विद्यार्थी व शिक्षक यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन केले त्यानंतर प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला. खरकाडी तांडा येथील दैनिक चालू वार्ता चे पत्रकार श्री रमेश राठोड यांच्या तर्फे शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.