
दैनिक चालु वार्ता
शहादा प्रतिनिधी
क्रिष्णा गोणे
शहादा :- शहादा तालुक्यातील बर्डीपाडा येथे जो / जी कोणीही ईयत्ता १० वी मध्ये फक्त गावातून पहिला येतो / येते त्याला २६ जानेवारी चा ध्वज फडकवणेचा मान दिला जातो आणि १२ वी मध्ये गावातून पहिला येतो / येते त्याला 15 ऑगस्ट चा मान दिला जातो. त्यामुळे मुले / मुली तो मान मिळवण्यासाठी खूप अभ्यास करतात. जरा विचार करा जर हे प्रत्येक गावाने केलं तर गावातील राजकारण बंद होऊन खरे समाज कारण होईल व अभ्यासू पिढी निर्माण होईल.
आहे ना ? आदर्श घेण्यासारखं.. अशाच अनेकविध आदर्श सामान्य व्यक्तींना अशा सोहळ्याचा मान दिला पाहिजे..असे मला वाटते..कशाला हवेत राजकारणी..किंवा कोणी श्रीमंत उद्योजक..? त्यांचे आयुष्य सामान्य माणसांसाठी खरेच आचरणात आणण्या सारखे असते का ?
आज एक फौजी बंटी गोसावी चा हस्ते ध्वज फडकविला समस्त गावकरी मंडळी व युवा सेना महाराष्ट्र गृहरक्षक दल(होमगार्ड) सोमनाथ पावरा, महेंद्र चौहाण, विठ्ठल रावताले, रोहित भंडारी, मेहेरबान भंडारी, प्रदीप भामरे, अनिल रावताले, काकड्या भामरे, रोहिदास भंडारी,अर्जुन भंडारी, गोविन रावतले, विकेश पवार, आशा वर्कर्स, लक्ष्मी ठाकरे, प्रकाश पवार, मंगल पटले, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक, मोठ्या संख्येने उपस्थित गावकरी मंडळी विद्यार्थी सेना मिळून पार पाडली.