दैनिक चालु वार्ता
शिरपूर प्रतिनिधी
महेंद्र ढिवरे
शिरपूर :- 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनाचे आयोजन विद्यालयातील मतदार साक्षरता मंच व राष्ट्रीय सेवा योजना एकक च्या माध्यमातून घेण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री. आर.एफ.शिरसाठ सर होते. भारतीय निवडणूक आयोगाचा स्थापना दिन 25जानेवारी1950हा दिवस भारतात 2011पासून’ राष्ट्रीय मतदार दिवस’ म्हणून देशभर मतदार गौरव दिन म्हणून साजरा केला जातो या वर्षाचा बोध विधान “सक्षम, जागरूक, सुरक्षित आणि माहितगार मतदार” हे आहे.
याचे महत्व व मतदार म्हणून आपली काय कर्तव्य असतात याची जाणिव विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी श्री. एन.वाय. बोरसे यांनी आपल्या मार्गदर्शन विचारात करून दिली.अध्यक्षीय भाषणात प्राचार्य श्री. आर.एफ. शिरसाठ यांनी मतदान आणि मतदार यांचे महत्व देश विकासात मोठे कार्य आहे या कर्तव्याचे पालन प्रत्येक मतदाराने केले पाहिजे असे आव्हान केले.
या निमित्ताने विद्यालयात निबंध स्पर्धा घेण्यात यात दोन गटात मतदार जागृतीपर ,निबंध घेण्यात आले यात माध्यमिक विभाग 15 ,उच्च माध्यमिक विभागात20 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला, परीक्षक म्हणून प्रा.व्ही. एस.ईशी व श्री.किरण कोळी यांनी कार्य केले कार्यक्रमात एन एस एस स्वयंसेवकांनी आपला सहभाग नोंदवला , श्री एस आर देसले यांनी सूत्रसंचालन व आभार श्री व्ही डी पाटील यांनी मानले कार्यक्रमाला पर्यवेक्षक श्री पी व्ही पाटील व सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते