
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे
दि.25 नांदुरा :- नांदुरा तहसील अंतर्गत येणाऱ्या लोकाभिमुख कामे तहसीलदार तालुका न्याय व दंडाधिकारी असतांनाही लोकांना न्याय मिळत नसेल तर तहसीलदार या पदाचा काय फायदा. असे उपोषण कर्त्यांचा सवाल आहे. यामधे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे यांची अवैध पेट्रोल पंपावर कार्यवाही बाबत नांदुरा तहसील समोर आमरण उपोषण सुरू आहे.सोबतच दुसरे उपोषण घरकुल घोटाळा बाहेर काढल्यानंतर ही नगर परिषद मुख्याधिकारी कार्यवाही करत नसल्याने तहसील समोर दत्तात्रय करांगळे आमरण उपोषणास बसले आहे.
तसेच तिसरे उपोषण हे सामाजिक वनीकरण अंतर्गत वृक्ष लागवडीत झालेल्या घोटाळ्या साठी नागेश तांदळे उपोषणाला बसले आहे.चौथे उपोषण हे वडिलोपार्जित जमिनीचे साताबर्यात नाव वारंवार सांगूनही तहसीलने नाव जोडले नसल्याने जगन्नाथ चोपडे हे आमरण उपोषणाला बसले आहेत.ऐन गणराज्य दिनाच्या पूर्वसंध्येला नागरिकांना आमरण उपोषणाला बसावे लागले ही बाब लोकशाहीला काळीमा फासणारी आहे असे जनतेकडून बोलले जात आहे.