
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे.
देगलूर :- अनेक दिवसापासून एस. टी .कर्मचाऱ्यांचे संप संपता संपेना या संपाला प्रशासनाचे दुर्लक्ष मुळे त्या एस .टी. कर्मचाऱ्यांना उपासमारीची वेळ आली आहे आज देगलूर आगारातील दुखवटा मध्ये सामील कर्मचारी मा. तहसिलदार साहेब देगलूर याना निवेदन देण्यात आले. एस टी कर्मचारी गेल्या तीन महिन्यांपासून 80 च्या आसपास कर्मचारी शहिद झालेले असुन त्या साठी दुखवटा पाळत आहेत.
तीन महिन्यानंतरहि एस टी कर्मचारी याना पगार मिळेलेला नाही त्यामुळे कर्मचारी आणि त्यान्च्या कुटुंबाची उपासमारीची वेळ आलेली आहे. त्या संदर्भात आणि प्रशासनाने कर्मचारीवर केलेल्या बेकायदेशीर कार्यवाही याबाबत माहिती दिली आहे. मा. तहसिलदार साहेब यानी एस टी कर्मचारी देगलूर यान्चेविषयी बोलताना सहानुभूती व्यक्त केली.