
दैनिक चालु वार्ता
पालघर प्रतिनिधी
प्रा. मिलिंद खरात
पालघर :- 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त जिल्हापरिषद शाळा डोहोळेपाडा ,केंद्र कोशिंबी ता.भिवंडी जिल्हा ठाणे येथे दिनांक 26 जानेवारी 2022 रोजी सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रथम भारतीय संविधान निर्माते,विश्वरत्न, भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रतिमेला प्रा.निवृत्ती मगर अध्यक्ष शंभूप्रतिष्ठान यांनी पुष्पहार अर्पण तर ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव यांनी भारतीय संविधान प्रतिला पुष्प अर्पण केले तसेच शाळाव्यवस्थापन समिती सदस्या अनिता मोरे व ग्रामपंचायत सदस्या रेश्मा मगर यांनी दीपप्रज्वलन केले.
तद्नंतर सहशिक्षका दिलशाद शेख यांनी भारतीय संविधान उद्देशिकाचे वाचन केले उपस्थित सर्वांनी वाचनात सहभाग घेतला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ग्रामपंचायत सदस्या रेश्मा मगर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत व ध्वजगीताचे विद्यार्थांनी गायन केले. ध्वजारोहण होताच प्रजासत्ताक दिनाचा विजय असो,भारतीय संविधानाचा विजय असो,लोकशाहीचा विजय असो,डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो,भारत माता की जय,वंदेमातरम, अशा घोषणा देऊन प्रजासत्ताक दिनाचा जयघोष करण्यात आला.
प्रजासत्ताक दिनानिमित्त प्रा.निवृत्ती मगर यांनी विचार मांडून संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व शुभेच्छा दिल्या. सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त विचार मांडताना सांगितले की, 26 जानेवारी प्रजासत्ताक हा आपल्या भारतीयांचा फार मोठा सण आहे.तो प्रत्येक नागरिकांनी मोठ्या आनंदात साजरा केला पाहिजे.15 ऑगस्टला1947 ला देश जरी स्वतंत्र झाला असला तरी खऱ्या अर्थाने आपण 26 जानेवारी 1950 पासून स्वतंत्र झालो आहोत.
भारतीय संविधान निर्माते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अपार कष्ट करून, स्वतःची तब्येत ठीक नसताना सुद्धा रात्रंदिवस जागून 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात भारतीय संविधान लिहून भारत देशाला अर्पण केले. संविधानात,प्रत्येक माणसाला त्याचे मुलभूत हक्क अधिकार दिले जे कोणीच हिरावून घेऊ शकत नाही म्हणून संविधानाचा प्रचार प्रसार करून लोकशाही टिकवणे हे आपल्या हातात आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक सहशिक्षक अशोक गायकवाड यांनी केले.
विद्यार्थांना गोड खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. यावेळी ग्रामपंचायत सदस्या रेश्मा मगर ,ग्रामपंचायत सदस्य सिद्धोधन जाधव, शंभूराजे प्रतिष्ठान डोहोळे अध्यक्ष प्रा.निवृत्ती मगर,शाळाव्यवस्थापन समिती अध्यक्ष विष्णू मोरे,सदस्या अनिता मोरे,मुख्याध्यापक जगदीश जाधव, सहशिक्षक अशोक गायकवाड, सहशिक्षिका दिलशाद शेख, ग्रामस्थ, युवक ,युवती,विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.