
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी कलंबर
बाजीराव गायकवाड
कलंबर :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी संजय गांधी मा. व उच्च. मा. विद्यालय कलंबर ता. लोहा जि. नांदेड या शाळेत भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन करून मुख्याध्यापक श्री.मामडे एस. एन. यांच्या हस्ते ७:४५ वाजता झेंडावंदन संपन्न झाले. या कार्यक्रमात ध्वजाला सलामी देऊन ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी परीसरातील पालकांची उपस्थिती होती, शाळेतील जेष्ठ प्राध्यापक शेट्टे सर यांनी प्रजासत्ताक दिनाची सविस्तर माहिती सांगितली. संभाजी तुप्पेकर सर यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. स्वामी सर, आगलावे सर यांनी ध्वजाचे पुजन केले. शाळेतील शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थी व विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित होते.