
दैनिक चालु वार्ता
नांदेड उत्तर जिल्हा प्रतिनिधी
समर्थ दादाराव लोखंडे
कंधार :- स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त श्री शिवाजी कॉलेज कंधार येथे स्वामी रामानंद तीर्थ यांच्या पुतळ्याचे अनावरण संस्थेचे संस्थापक व संचालक डॉ भाई केशवराव धोंडगे साहेब यांच्या विशेष उपस्थिती मध्ये संस्थेचे सचिव माजी आमदार भाई गुरुनाथ रावजी कुरुडे साहेब यांच्या हस्ते दि 26 जानेवारी 2022 रोजी करण्यात आले. स्वामी रामानंद तीर्थ यांचे हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतिकारी नेतृत्व व त्यांच्या प्रेरणेतून आपल्या भागात मर्द बाण्याने या क्रांतिकारी लढ्यात यांच्यासोबत उतरलेले डॉ. केशवजी धोंडगे साहेब व गुरुनाथ रावजी कुरुडे साहेब यांनी त्यांच्या योगदानाची प्रेरणा सदैव ज्वलंत राहावी व विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा पुतळा उभारण्यात आला असल्याचे सांगितले त्यावेळी कॉलेजचे प्राचार्य श्री जी .आर. पगडे सर माधवराव पेठकर ,माधवराव आंबटवाड. इतर सहकारी प्राध्यापक प्राध्यापिका कर्मचारी आणि एन .सी .सी .चे सर्व विद्यार्थी उपस्थित होते