
दैनिक चालु वार्ता
लोहा प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- जन्म भूमी बदल मला खूप प्रेम आहे असे प्रतिपादन लोहा तालुक्याचे भूमीपुत्र तथा रिसनगावचे रहिवासी व पुणे येथील प्रसिद्ध उद्योजक भीमाशंकर मामा कापसे यांनी लोहा येथे नगर परिषदेत त्यांच्या वाढदिवसानिमित्त सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान व महिला कर्मचाऱ्यांना साडी चोळीचे वाटप या कार्यक्रमात केले.
पुणे सुप्रसिद्ध उद्योजक भीमाशंकर मामा कापसे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकी जोपासत प्रसिद्ध उद्योजक भीमाशंकर मामा कापसे मित्रमंडळाच्या वतीने लोहा नगर परिषदेच्या प्रगणांत लोहा न.पा.तील सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते सुधाकर पाटील पवार होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध उद्योजक भीमाशंकर मामा कापसे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब पाटील कराळे, जिल्हा परिषद सदस्य चंद्रसेन पाटील ,शिवसेना तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल, शिवसेनेचे शहरप्रमुख मिलिंद पाटील पवार, किसान सेनेचे लोहा तालुका प्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, संभाजी ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष बालाजी पाटील जाधव, दिपक रायफळे, सतीश पाटील बाबर, माणिक पवार, बालाजी एकलारे, प्रशांत पोतावार, सरपंच माधव तिगोटे, प्रसाद पोले, बालाजी पाटील इसादकर, न.पा. कर्मचारी मदन पोहाड,खंडू कांबळे, गोविंद नामपले, पिराजी दाढेल, शंकर वाघमारे, बाबु कांबळे, यांच्या सह न.पा. च्या सर्व महिला कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी लोहा न. पा. च्या महिला सफाई कर्मचाऱ्यांचा भीमाशंकर मामा कापसे व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करुन ७०० रुपयांची शालू. साडी ब्लाऊज फीस, दोस्ती,टोपी, भेट देण्यात आली. यावेळी पुढे बोलताना भीमाशंकर मामा कापसे म्हणाले की,आपण बघतो की, बरेच जण सत्कार हा वरच्याच वर्गाचा होतो आमचे मित्र प्रसाद पोले, दिपक रायफळे, यांनी ही संकल्पना मांडली की सफाई कामगारांचा सन्मान करावा माझी कर्मभूमी पुणे आहे व जन्मभूमी ही आहे मला जन्मभूमी बदल खूप प्रेम आहे. माणूस असावा माजी आमदार रोहिदास चव्हाण यांच्या सारखा सात्विक, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सारखा डॅशिंग, नामदार अशोकराव चव्हाण साहेबां सारखा हुशार, त्यांचे गुण घ्यावेत.
जे साफसफाई कर्मचारी आहेत ते खूप महान आहेत जे कचरा करतात त्यांना माहीत नसत प्रत्येकांनी कचरा करु नये. आपल्या भारत देशाचे पंतप्रधान यांची ही संकल्पना आहे की स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान करा त्यामुळे आम्ही त्यांच्या सुचनेचे पालन करीत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मानाचा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. प्रत्येकांने रस्त्यावर कचरा टाकू नये असे भीमाशंकर मामा कापसे म्हणाले. तसेच यावेळी अध्यक्षीय भाषणात सुधाकर पाटील पवार म्हणाले की, सफाई कामगार हे चतुर्थ श्रेणी चे आहेत ऊन, पाऊस, थंडी याची पर्वा न करता शहरात सफाईचे कामे करतात भीमाशंकर मामांनी त्यांचा सन्मान केला खूप चांगला उपक्रम राबविला असेच कार्यक्रम आम्ही राबवूत अशी ग्वाही मी देतो भीमाशंकर कापसे मामांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने उदंड आयुष्य लाभो असे सुधाकर पाटील पवार म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विनोद गवते यांनी केले तर आभार प्रसाद पोले यांनी मानले.