दैनिक चालू वार्ता
मोखाडा प्रतिनिधी
अमोल टोपले
मोखाडा.आरोहण सामाजिक व शैक्षाणिक संस्था मोखाडा यांच्या माध्यमातून पोशेरा येथे आज जगदंबा मातेच्या मदिरांत मुलांच्या कला गुणांना वाव देत विविध प्रकारचे गाणे, नाटक, करोना जन जागृती भारूड अश्या प्रकारचे सांस्कृतीक कार्यक्रम घेण्यात आले त्यावेळी नुकत्याच सुरू झालेल्या शाळेतील मुंलाना दुधात साखर पडल्यागत झाले यावेळी शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद प्रत्येक मुलाच्या चेहऱ्यावर दिसत होता या वेळी या चिमुकल्यांचा आनंद बघण्यासाठी पोशेरा गावातील ग्रामस्थ व संस्थेतील पदाधिकारी आणि शाळेतील चिमुकल्यानी भरपुर आंनद लुटला त्यावेळी उपस्थित असलेले गावकरी महिला वर्ग नोकरवर्ग संस्थेचे कार्यकर्ते उपस्थित होते . सरते शेवटी गावकऱ्यांच्या हस्ते मुलांना ट्रॉफी,वह्या,कलरपेन अश्या विविध प्रकारचे शालेय उपयोगी वस्तु संस्थेच्या माध्यमातून दिल्या गावकऱ्यांनी संस्थेचे आभार मानत कार्यक्रमास पूर्ण विराम दिला.