
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
नांदेड :- दरवर्षी प्रमाणे याही वर्षी छञपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सव नांदेड शहरात मोठ्या हर्षोउल्हासात कोरोणाचे सर्व नियमांचे पालन करत साजरा होणार असून त्या समितीच्या अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील तर स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. मराठा सेवा संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव कार्यकारिणी निवडी संदर्भात अत्यंत महत्वाची बैठक यशवंतराव चव्हाण मराठा विद्यार्थी वस्तीग्रह नांदेड येथे संपन्न झाली.बैठकीच्या अध्यक्षस्थानी मराठा सेवा संघाचे प्रदेश सहसचिव प्रा.डाॅ पंजाब चव्हाण हे होते.
मराठा सेवा संघ कृषी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष सोपानराव क्षीरसागर,मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक इंजि. शे.रा.पाटील, शिवाजीराव खुडे,वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवाजीराजे पाटील,पंडीतराव कदम शिक्षक परिषदेचे प्रदेश सचिव व्यंकटराव जाधव, जिजाऊ ब्रिगेड च्या जयश्री भायेगावकर,मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष नानाराव कल्याणकर,मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष उद्धव सुर्यवंशी, जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्ष अरुणा जाधव आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते.
नांदेड जिल्ह्यात छञपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव १९ फेब्रुवारी रोजी गेल्या पंचवीस-तीस वर्षापासून वैचारिकरित्या करणारी एकमेव मराठा सेवा संघ संघटना राहिलेली आहे.या उत्सवात महिलांचा युवकांचा हजारोने सहभाग असतो.शिवजन्मोत्सव कोरोणा नियमाचे पालन करून शासन नियम कश्या पद्धतीचे येतात त्यानुसार करुयात असं मत यावेळी बैठकीचे अध्यक्ष मराठा सेवा संघाचे प्रदेश सहसचिव प्रा.डाॅ.पंजाब चव्हाण यांनी मांडले. मराठा सेवा संघ व ३२ कक्ष आयोजित सार्वजनिक शिवजन्मोत्सव समिती अध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील,यांची तर स्वागताध्यक्षपदी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
यावेळी मराठा सेवा संघाचे पंडीतराव पवळे, सतीश जाधव,रमेश पवार, पि.के.कदम,विक्रांत खेडकर,प्रल्हाद दुरपडे,रवी ढगे,जनार्धन कदम,उद्धव ढगे राधाकृष्ण होगे,शिक्षण महर्षी डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष शिवाजी पाटील बाभळीकर संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शाम पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष भगवान कदम,संगमेश्वर लांडगे,परमेश्वर पाटील, कमलेश कदम,संतोष धामदरीकर,दत्ता येवले, पंडीत धामदरीकर, जिजाऊ ब्रिगेडच्या मिनाक्षी पाटील,राणी दळवी, प्रभाकर राऊत,व दिलीप दळवे,परमेश्वर बोडके,भागवत धुमाळ,स्वराज्य दळवे,बबलु बोडके यांच्यासह अनेक उपस्थित होते.