
दैनिक चालु वार्ता हे वृत्तपत्र आम्ही दररोज न चुकता दै. चालु वार्ता बर्दापूर सर्कल, अंबाजोगाई या ग्रुपवर वाचतो. दै. चालु वार्ता चे प्रतिनिधी श्री. आप्पासाहेब चव्हाण यांच्या मार्फत आम्हाला हा पेपर वाचण्यासाठी उपलब्ध झाला. चालु घडामोडी व घटना आपण पारदर्शक पणे व परखडपणे या ठिकाणी मांडता व सत्यता पडताळून त्या आमच्यापर्यंत पोहोचवतात, त्याबद्दल मी श्री. दिनकर कुलकर्णी, एक वाचक म्हणून आपले व आपल्या सर्व टिमचे कौतुक करतो व मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.
आपल्या माध्यमातून समाजाच्या सर्व स्तरातील चालु माहिती आमच्यापर्यंत पोहोचते.याची मुद्रीत आवृत्ती लवकरच आमच्यापर्यंत पोहचेल अशी आशा व्यक्त करतो. आपला दैनिक चालु वार्ता पेपर यशाची उत्तुंग भरारी घेवो व यशाच्या शिखर स्थानी प्रस्तापित होवो हीच महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना.