
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :-प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण सकाळी ७ :१५ वाजता श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय बारूळ येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी गावातील प्रतिष्ठित नागरिक ध्वजारोहणासाठी उपस्थित होते. यामध्ये बारूळ गावचे भूमिपुत्र माधव सुरूमवार हे लड्डाक येथे मिलिट्री मॅन म्हणून देश सेवेसाठी सीमेवर कार्यरत आहेत. तेसुद्धा यावेळी मिल्ट्रीमॅन च्या वेशामध्ये ध्वजारोहणासाठी उपस्थित होते.
ध्वजारोहणासाठी पाच वर्षाचा मुलगा सम्यक संघपाल वाघमारे हाई उपस्थित होता. या चिमुकल्या मुलांने अंगावर मिलिट्री मॅन चा पूर्ण ड्रेस परिधान केलेला होता. तो मुलगा मनाला की पप्पा हा माझ्यासारखाच ड्रेस घालून कोण आहे, तेव्हा मी त्याला सांगितले की हे देश सेवा करण्यासाठीचे मिलिट्री मॅन आहेत. तेव्हा तो चिमुकला म्हणाला मलाही या मिल्ट्रीमॅन सारखे व्हायचे आहे.
म्हणून तो मुलगा मला त्या मिल्ट्रीमॅन ला भेटायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली. आणि तो मुलगा त्या मिल्ट्रीमॅन ला भेटण्यासाठी गेला. आणि म्हणाला मलाही तुमच्या सारखे मिल्ट्रीमॅन व्हायचे आहे. एवढे ऐकून जवान माधव सुरुमवाड यांनी त्या चिमुकल्या चे कौतुक केले. आणी म्हणाले हा मुलगा नक्कीच देश सेवेसाठी काहीतरी करणार आहे. असे उदगार काढले. आणि शेवटी त्या लहान मिल्ट्रीमॅन च्या वेशातील मुलांनी जवान माधव सुरुमवाड यांना सॅल्यूट मारून स्वागत केले.