
दैनिक चालु वार्ता
भंडारा प्रतिनिधी
राजेश गेडाम
भंडारा :- याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती शुभांगी सुनील मेंढे कोषाध्यक्ष सत्यम एज्युकेशन सोसायटी व विनय अंबुलकर संचालक सत्यम एज्युकेशन सोसायटी प्रामुख्याने उपस्थित होते.सर्वप्रथम प्रमुख पाहुण्यांचा हस्ते झेंडा फडकविण्यात आला त्यानंतर शाळेच्या प्राचार्या शेफाली पाल यांनी शुभांगी मेंढे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले तर कल्पना जांगडे यांनी विनय अंबुलकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
त्यानंतर शाळेचे विद्यार्थी निधी मेहेर,अजिंक्य भागवत, अभिर पांडे,यांनी सुरेल देशभक्तीपर गीते सादर केली तर शर्वरी जुवार या विद्यार्थिनीने आपल्या भाषणातून गणतंत्र दिनाचे महत्त्व सांगितले.
शाळेचे संचालक श्री विनय अंबुलकर यांनी आपल्या भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत गणतंत्र दिवस हा भारताचे शक्तिप्रदर्शन करण्याचाही दिवस आहे,ही शक्ती आपल्याला कोणावरही हल्ला करण्यासाठी नाही तर स्वसंरक्षणासाठी वापरायची आहे विद्यार्थ्यांनी इतिहास न विसरता पुढच्या पिढीसाठी इतिहास घडवायचा आहे.
तसेच श्रीमती शुभांगी मेंढे यांनी आपल्या भाषणातून गणतंत्र दिवसाचे महत्त्व सांगताना हेही सांगितलं की सर्व शक्ती प्रदर्शनाबरोरच नारीशक्ती किती ताकदवर आहे हे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे उदाहरण देऊन स्पष्ट केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता ९वी चे विद्यार्थी आर्य रामटेके व परिमल कोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रेया साकुरे हिने केले.
या प्रसंगी मंचावर प्रमुख पाहुण्यांबरोबर प्राचार्या शेफाली पाल,केजी प्रमुख कल्पना जांगडे,प्रायमरी प्रमुख समृद्धी गंगाखेडकर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम गीताने झाली व शेवटी विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.