
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
लोहा :- जगात लोक मनतात आताच्या युगात माणसांमध्ये माणुसकीचं उरलेली नाही , पण तसे न होता आजच्या काळात अनेक व्यक्ती माणुसकी जोपासतात , सामाजिक बांधिलकीचा आशेचा किरण अद्यापही कायम असल्याचे एक उदाहरण म्हणजे आझाज ग्रुपचे अध्यक्ष पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक भिमाशंकर मामा कापसे होय. लोह्यापासुन काही अंतरावर रिसनगाव हे गाव आहे या गाव रस्त्याची दयनीय अवस्था झाली असुन रस्त्याच्या दोन्ही दुर्तफांनी काटेरी झाडे वाढले असुन या काटेरी झाडांमुळे काल एक अपघात घडला हा अपघात पुणे येथील सुप्रसिध्द उद्योजक भिमाशंकर मामा कापसे यांच्या कानी पडताच त्यांनी क्षणाचाही विचार न करता त्या रस्त्याच्या दोन्ही दुतर्फावर असलेले काटेरी वृक्ष , जेसीबीच्या सहाय्याने काढुन रस्ता सुरक्षीत स्वखर्चाने करुन दिला.
समाजात चांगले काम करीत राहा, सामाजिक बांधिलकी खूप महत्त्वाची आहे, हि खुप महत्वाची असते*
( भिमाशंकर कापसे अध्यक्ष आझाद ग्रुप महाराष्ट्र )
जिया ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत कोरोना काळात सध्या भिमाशंकर कापसे यांनी पुणे येथे अनेक नागरीकांच्या , गरजु व्यक्तीच्या आडी आडचीला मदत करत आपली सामाजिक बांधिलकी जोपासली. पुण्यामध्ये अनेक ठिकाणी आपल्या कार्यक्षेत्रात भिमाशंकर कापसे यांनी सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, कला-क्रीडा, कृषी, व्यवसाय , यात सर्वेत्तम कामगीरी करत आता आपल्या मातृभूमीकडे कामाचा वेग वाढवला असुन नुकत्याच पार पडलेल्या अभिष्टचिंतनसोळ्यानंतर लोहा कंधार मतदारसंघात आझाद ग्रुपचे अध्यक्ष भिमाशंकर मामा कापसे यांचा बोलबाला प्रत्येक ठिकाणी ऐकावयास मिळत असल्याचे चित्र दिसुन येत आहे.