
दैनिक चालु वार्ता
नांदेड प्रतिनिधी
गोविंद पवार
◼️लोह्याच्या इतिहासातील सर्वाधिक लोकप्रिय नगराध्यक्ष वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम संपन्न
◼️ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचे कीर्तनाला प्रचंड प्रतिसाद
अध्यक्षाची बढती होऊन आमदार व्हावे पुरुषोत्तम महाराज यांनी दिला आशीर्वाद
लोहा :- लोहा शहराचे कर्तव्यदक्ष लोकनियुक्त लोकप्रिय नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांना वाढदिवसानिमित्त जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव झाला सर्वाधिक लोकप्रिय नगराध्यक्षांचा समान नगराध्यक्ष यांनी मिळवला आहे अशी चर्चा जनतेतून होत आहे नगराध्यक्ष यांचा वाढदिवस दिनांक 26 जानेवारी रोजी विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला .
यावेळी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून केशव पाटील पवार व बाळासाहेब कतुरे यांनी सुप्रसिद्ध कीर्तनकार ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील बुलढाणेकर यांचा कीर्तनाचा कार्यक्रम जुना लोहा येथे ठेवण्यात आला होता या किर्तनाला लोहा शहर व परिसरातील जनतेने प्रचंड प्रतिसाद दिला व हजारोच्या संख्येने भाविक भक्तांनी या कीर्तनाचा लाभ घेतला तुकाराम महाराज यांच्या गाथ्यातील अभंग वैष्णव तो जया अवघी देवराया माया नाही आणिक प्रमाण तन-मन-धन तुझं पडता जड भारी नेमा नटले निर्धारित तुका म्हणे याती हो का तयाची भलती.
या अभंगावर महाराजांनी कीर्तन केले पुढे बोलताना माहाराज असे म्हणाले की आतापर्यंत अनेक कार्यक्रम झाले परंतु नगराध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त कुठेही कार्यक्रम झाला नाही खासदार आमदार पेक्षाही नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी यांच्या वाढदिवसाला कीर्तनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे त्यांची लोकप्रियता एवढी जास्त दिसून येते आहे की एवढा मोठा जनसमुदाय त्याची साक्षीदार आहे . नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांची आता बढती होऊन आमदार व्हावेत असा आशीर्वाद पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर यांनी दिला कार्यक्रमाचे आयोजक केशव पाटील पवार बाळासाहेब कतुरे यांचेही कौतुक ह भ प पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी केले.
तसेच या वेळी कीर्तनात प्रवचन देताना पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर म्हणाले की कीर्तनातून जातिवाद निर्मूलन होते संत या जगाच्या पाठीवर फक्त दोनच होऊन गेली जगद्गुरु संत तुकाराम महाराज व संत ज्ञानेश्वर महाराज बाकी कुणीही संत नाही फक्त बुवा आहेत कीर्तनातून ऊर्जा मिळते आतापर्यंत आपण कधी ऐकली का कीर्तनात जाऊन कुणी कोरोना पॉझिटिव झाले आहे झाले असतील तर ते निगेटिव्ह होतात तसेच मानवाने देवाचे ध्यान करावे संतांच्या सहवासात राहावे त्यामुळे त्यांचे जीवन सुखमय होते असे पुरुषोत्तम महाराज बुलढाणेकर म्हणाले.
तसेच लोहा शहरात विविध ठिकाणी रात्री बारा वाजेपासून दुसऱ्या दिवशी बारा वाजेपर्यंत 24 तास लोकनियुक्त नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर हे उपस्थित होते. तसेच नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी लोहा न पा त जिल्हाभरातून अनेक मान्यवर आले होते जि प सदस्य चंद्रसेन पाटील गोंडगावकर यांनी जेसीबी लावून प्रचंड मोठा गुलाबाच्या फुलाचा हाराने नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचा सत्कार केला या सत्काराने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
तसेच इंदिरानगर येथे नगरसेविका सौ शारदाबाई बबनराव निर्मले रीपाईचे मराठवाडा नेते बबनराव निर्मले यांनी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचा सत्कार केला लोहा शहरात फटाक्याची आतिशबाजी शहरवासीयांचे लक्ष वेधून घेत होते शहरातील कमानी शुभेच्छाचे बॅनर ही लावण्यात आले आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात नगरसेवक जीवन पाटील चव्हाण यांनी दोन जेसीबी लावून प्रचंड मोठा पुष्पहार घालून गुलाबाच्या फुलांची उधळण करून नगराध्यक्ष यांचे स्वागत केले तसेच लोहा बसस्थानकासमोर नगरसेवक भास्कर पवार पाटील पवार यांनी मंडप टाकून नगराध्यक्षा चा भव्य सत्कार केला .शहारात दिवसभर विविध उपक्रमांनी नगराध्यक्ष गजानन सूर्यवंशी यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.