
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
बोरसुरी :- औराद शहाजानी बोरसुरी येथील १८ वर्षाच्या वरील सर्व लाभार्थ्यांचा कोविड लसीचा पहिला डोस १००% पुर्ण झाल्याबद्दल ग्रामपंचायत कार्यालया कडून प्रमाणपत्र देण्यात आले. दोन महिन्यांच्या आरोग्य विभाग व पंचायत प्रशासन आणी आशा कार्यकर्त्यांनी लोकांचे समुपदेशन करुन जनजागृती करीत या लसीकरण मोहीमेत मोलाची भुमिका घेत १००% लसीकरण पुर्ण करुन घेण्यात यशस्वी झाले. त्यामुळे येणाऱ्या कालावधीत लोकांना जरी कोरोना झाला तरी त्यांच्या जिवावर बेतणार नाही.
त्यामुळे या लोकांनीही आवर्जून सहभाग नोंदवत गाव १००% पुर्ण झाले व त्यासे आरोग्य विभागास प्रमाणपत्र देण्यात आले.
यावेळी सरपंच माणिक खरगे व ग्रामविकास अधिकारी मलिले आर. व्ही.तसेच आरोग्य वर्धिनी उपकेंद्र बोरसुरी चे समुदाय आरोग्य अधिकारी , डॉ.ससाणे वैशाली , ए.एन.एम. शेख , उपस्थित होते.