
दैनिक चालु वार्ता
निलंगा प्रतिनिधी
राहुल रोडे
निलंगा :- औराद शहाजनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद शाखा औराद व शंभुराजे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिरंगा पदयात्रा काढण्यात आली . राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा कार्यवाह श्री किशोरजी पोतदार यांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करून पदयात्रेची सुरुवात करण्यात आली. यावेळी लातूर जिल्हा सह-संयोजक अमित शिंदे यांनी भारतीय स्वातंत्र्याची 73 वर्ष या विषयाची मांडणी केली.
यावेळी शहर मंत्री श्री व्यंकटेश झंवर , शहर सहमंत्री चंद्रशेखर कादोडे , अनुज चांडक, वरदराज झंवर,आकाश बिरादार, शंभुराजे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष – ओम भंडारे , सचिव-सागर गोपने , कोषाध्यक्ष-विष्णु गवळी, हणमंत कापडे, बजरंग हालसे,पवन शिंदे, अनिकेत जाधव, आदर्श थेटे, मुकेश मोरे, दर्शन व्हने,अजय शिंदे, विष्णु डोईजोडे, देवानंद शिंदे, विकास ऐनापुरे, तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी विद्यार्थ्यांनी भारत माता की जय वंदे मातरम या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.