
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतीनीधी
महेश गोरे
लोहारा :- लोहारा शहरातील नगरपंचायत मधील प्रथमच निवडून आलेल्या प्रभाग क्रमाक ६ मधील नुतन शिवसेनेच्या नगरसेविका सौ. मयुरी अमोल बिराजदार यांनी कै.विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजनेचा च्या माध्यमातून गुरुवारपासुन प्रारंभ करण्यात आला. लोहारा नगरपंचायत निवडणुकीत दिलेल्या वचननाम्याप्रमाणे शहरातील प्रभाग क्रमांक ६ संपूर्ण घरपट्टी, नळपट्टी मुक्त वॉर्ड करण्यासाठी नगरसेविका सौ.मयुरी अमोल बिराजदार यांच्या माध्यमातुन सतत पाच वर्षे राबविण्यात येणाऱ्या कै. विश्वनाथराव गायकवाड कर सवलत योजना प्रत्यक्षात गुरुवार २७ जानेवारी पासुन सुरूवात करण्यात आले आहे.
या योजनेच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक सहा मध्ये घरपट्टी, नळपट्टी पूर्ण भरणाऱ्या नागरीकास नगरसेवकांच्या माध्यमातुन १० टक्के कर स्वत: भरण्यात येणार आहे. त्यात प्रत्यक्षात तीन जणांच्या कराचा भरणा करत काम सुरु करण्यात आले आहे. यावेळी लोहारा नगरपंचायतचे कार्यालयीन अधिक्षक जगदिश सोंडगे, युवासेना तालुका प्रमुख अमोल बिराजदार, कर्मचारी श्रीशैल्य मिटकरी यांच्या सह नागरीक उपस्थित होते.