
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी चंद्रपूर
प्रदिप मडावी
चंद्रपूर :-वडगाव प्रभागातील झालेल्या कामाचे एक कोटी रुपयांचा भ्रष्टाचार नुकताच आम आदमी पक्षाने उघडकीस आणला. घोटाळ्याशी संबंधित आम आदमी पक्षाने मनपा कड़े तक्रार केली होती व 27 तारखेपासून ठिय्या आंदोलन चा मनपाला इशारा दिला होता. याची दखल घेत आज आम आदमी पक्षाने या आंदोलनाची तयारी केली. असल्यास मोठ्या पोलीस बंदोबस्तात आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळासोबत आयुक्ताने पुन्हा एकदा कोविड चे कारण पुढे करून नकार दिला व मनपाच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चा करण्यास सांगण्यात आले त्या चर्चेमध्ये वादग्रस्त निविदा रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले व संबंधित प्रकरणाची सात दिवसात चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आम आदमी पक्षाच्या शिष्टमंडळाला आश्वासन देण्यात आले.
आम आदमी पक्षाच्या पत्रकार परिषदेनंतर शिष्टमंडळ दोन दिवस आधी आयुक्तांना भेटण्यास गेले असल्यास आयुक्तांनी भेट नाकारून पळ काढण्याचा प्रकार केला होता. आजही आयुक्तानी भेट नाकारली. त्यानंतर आम आदमी पक्षाने आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जिल्हाध्यक्ष सुनिल दे मुसळे तथा युवा जिल्हाध्यक्ष मयुर राईकवार यानी दिल्यानंतर पालिका बॅकफूटवर आल्याचे दिसत आहे आपने मनपाच्या जागेवर बांधकाम करना्या कंत्राटदारांवर कार्यवाही करण्याची मागणी केली .या वेळेस पालिकेत झालेल्या बैठकीमध्ये आपचे शिष्टमंडळा मध्ये आम आदमी पक्षाचे जिल्हा कोषाध्यक्ष भिवराज सोनी ,शहर उपाध्यक्ष सिकन्दर सागोरे, शहर सचिव राजू कूड़े,जिल्हा सोशल मिडिया हेड राजेश चेटगुलवार , राजेश वीरानी आणि प्रतीक वीरानी, कालिदास ओरके,सुजित चेटगुलवार,चंदू माडूरवार, अशरफ सैयद इत्यादि उपस्थित होते।