
दैनिक चालु वार्ता
पालघर मोखाडा प्रतिनिधी
अनंता टोपले
पालघर :- सलग दोन वर्ष कोरोनाच्या लाटेने अनेक जीव आपल्याला गमवावे लागले यातील अनेकांना वेळेवर ऑक्सीजनही मिळाले नव्हते तेंव्हा डॉक्टर नर्स सर्व आरोग्य कर्मचारी आणि कोरोना योद्धा मध्ये प्रचंड ईच्छाशक्ती असताना अनेकदा हतबल व्हावे लागत होते मात्र आज जव्हार आणि मोखाडा दोन्ही रुग्णालयात २४ तास ऑक्सीजन उपलब्ध होईल असे प्लांट निर्माण झाल्याने ईच्छाशक्तीची कमतरता नव्हतीच आता ऑक्सीजनचीही नाही असे प्रतिपादन आमदार सुनिल भुसारा यांनी केले जव्हार आणि मोखाडा येथे ऑक्सीजन प्लांटचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले तसेच न्युक्लीअस बजेट अंर्तगत विविध योजनांचे वाटपही आमदार भुसारा यांनी केले.
यावेळी भुसारा पुढे म्हणाले कि आरोग्य सेवकांनी कोरोना मध्ये जीवाची बाजी लावून काम केले त्याच बरोबर कोरोनासाठी काम करणाऱ्या सगळ्याच मंडळीनी स्वतःला झोकुन दिले होते अशा लोकांशी झटणाऱ्या लोकांच्या सोबत मी केंव्हाही उभा असेन याभागातील सर्वार्थाने आरोग्य सेवा बळकट करण्यासाठी हवे ते मागा निधी कमी पडु देणार नाही असे वचनही यावेळी भुसारा यांनी दिले तसेच याबाबत पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांचेही आभार मानले.
मागील कोरोनाच्या दोन्ही लाटेत अनेक रुग्णांची होणारी हेळसांड तसेच ऑक्सीजन अभावी मृत्यूमुखी पडलेले लोक अस अतिशय विदारक चित्र सगळीकडे पहावयास मिळत होते मोखाडा जव्हार मधील कोरोना रुग्णाना रीवेरा डहाणु येथील धुंदलवाडी येथील रुग्णालयाचा आसरा घ्यावा लागत होता. मात्र बेडची कमतरता ऑक्सीजन सेलेंडरची निकड भासत असे प्रसंगी तर ऑक्सीजनही मिळत नव्हता याबाबत आमदार भुसारा यांनी सतत पाठपुरावा करीत पालकमंत्री जिल्हाधिकारी यांच्याशी अनेकदा बैठकीत हा विषय पलटावर घेतला होता याचीच प्रचीती म्हणून पालकमंत्री दादा भुसे आणि जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी जव्हार येथे नियोजन समिती तर मोखाडा येथे गॅबरीयल च्या माध्यमातून ऑक्सीजन प्लांटची निर्मिती केली.
या प्लांट मधून हवेतून ऑक्सीजनची निर्मिती होणार असून २४ तास ऑक्सीजन निर्माण होणार आहे मागील वर्षभरात सीलेंडर आणण्यासाठी कुडुस पालघर अशा विविध ठीकाणी आमची धावपळ होत होती मात्र आज ऑक्सीजन निर्मिती जाग्यावरच होत असल्याचे समाधान असून सध्या बालकांच्या अतिदक्षता विभागात दररोज २४ तास ११ बालकांना ऑक्सीजनचा पुरवठा सुरूही झाल्याचे जव्हार कॉटेजचे वैद्यकीय अधिक्षक रामदास मराड यांनी सांगितले. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गुट्टे तसेच प्रांताधिकारी तथा प्रकल्प अधिकारी जव्हार आयुषी सिंह सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते