
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा दुर्गम भाग समजल्या जातो.एका छोट्याश्या झोपडीत राहणे आणि पहाडात जे पिकेल त्यावर आपला उदरनिर्वाह करणे असा तेथील आदिवासींचा नित्यक्रम आहे.मेळघाट मधील काही ठिकाणी सोयी-सुविधा उपलब्ध नसल्यामुळे व तेथील आदिवासी लोकांचे दैनंदिन जीवन खुप हलाकीचे असल्यामुळे कुटुंब चालविणे खुप अवघड जाते अश्यातच शिवभक्त ग्रुप अंजनगाव सुर्जी च्या वतीने आदिवासी लोकांकरिता ज्यांना कपडे वाटपाचा एक अनोखा उपक्रम हाती घेऊन प्रजासत्ताक दिवस साजरा करण्यात आला.
आपल्याकडे सर्व सोई-सुविधा उपलब्ध आहे परंतु मेळघाटातील बर्याच गावात सोई-सुविधांचा अभाव आहे.आदिवासी लोकांची खाण्याची,राहण्याची सोय नाही.काही भागात तर लाईट सुद्धा नाही त्यामुळे तेथील आदिवासीं लोकांना परिस्थितीला तोंड द्यावे लागते. मेळघात मधिल काही भागात जाऊन तेथे प्रजासत्ताक दिनी शिक्षणाचे महत्त्व सांगून तेथील गरजूंना कपडे,बिस्कीट,थंडी उपयुक्त स्वेटर वाटप करण्यात आले.
सर्व आम्ही भाग्यवान समजतो की आम्हाला देश सेवेची संधी प्राप्त झाली असे शिवभक्त ग्रुप च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.तसेच या उपक्रमाकरीता ज्या लोकांनी सहकार्य केले अश्या सर्व दांनविरांचे मनापासून आभार शिवभक्त ग्रुप च्या वतीने मानले.