
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- चांदूरबाजार स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय तूर खरेदीचा शुभारंभ जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चूभाऊ कडू यांच्या हस्ते आज करण्यात आला. विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन लि.आणि तालुका सहकारी खरेदी-विक्री संघामार्फत नाफेड तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ राज्यमंत्री श्री.बच्चू कडू यांचे हस्ते आधारभूत दराने तूर खरेदी करुन यावेळी करण्यात आला.केंद्र शासनाच्या आधारभूत योजनेतंर्गंत हंगाम २०२१-२२ साठी नाफेडचा तूर हमीभाव ६ हजार ३०० प्रति क्विंटल एवढा आहे.
राज्यमंत्री श्री.बच्चू कडू यांच्या हस्ते वजन काट्याचे पूजन करण्यात आले.तसेच तूर विक्रीस आणणारे शेतकरी दिवाकर राऊत रा.बेलोरा यांचा शाल, श्रीफळ व दुपट्टा देऊन सत्कार करण्यात आला. प्रारंभी समितीचे सभापती सतीश धोंडे,खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष शिवाजी बंड,उपाध्यक्ष श्रीपाद आसरकर यांनी राज्यमंत्री श्री.बच्चू कडू यांचा शाल-श्रीफळ देवून सत्कार केला.
बाजार समितीचे सचिव मनीष भारंबे,खरेदी-विक्री संघाचे व्यवस्थापक अशोक सिनकर,खरेदी-विक्री केंद्राचे उपाध्यक्ष श्रीपाद आसरकर,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सतीश धोंडे,उपसभापती अरविंद लंगोटे,मार्केटिंग फेडरेशन पणन व्यवस्थापक उमेश देशपांडे आदी यावेळी उपस्थित होते.
खरेदी विक्री संस्थेचे संचालक श्रीपाद आसरकर,संजय गुर्जर,रमेश घुलशे,डॉ.मोहोड,डॉ.किटुकले,साहेबराव पोहोकार,नामदेव शेकार,संचालक मंगेश देशमुख,सुभाष मेश्राम आदी यावेळी उपस्थित होते.