
दैनिक चालु वार्ता
औरंगाबाद जिल्हा प्रतिनिधी
अनिकेत संजय पुंङ
औरंगाबाद :- संभाजीनगर ज्योतीनगर चे माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर यांच्या जनसंपर्क कार्यालया समोरील प्रांगणात सालाबादा प्रमाणे यंदाच्या ही वर्षी कोव्हीड-१९ नियमांचे काटेकोर पालन करत प्रजासत्ताक दिना निमित्य उत्साहाने ध्वजारोहण करण्यात आले. सर्वप्रथम भारत मातेच्या प्रतिमेचे पूजन म.न.पा. स्वच्छता महिला कर्मचारी सौ. सुमित्रा सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व उपस्थितांनी भारत मातेच्या प्रतिमेस पुष्प वाहून अभिवादन केले . म.न.पा. स्वच्छता कर्मचारी ग्यानीवंत वाहूळ यांच्या हस्ते पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले.
राष्ट्रगीता नंतर चहा पानाने कार्यक्रम संपन्न झाला . याप्रसंगी माजी नगरसेवक गिरजाराम हाळनोर , अविनाश कुलकर्णी , बापू जाहागिरदार , सदानंद शेळके , प्रमोद जोशी , प्रकाश मगारे , शिवप्रकाश मिटकरी , ऍड. मंदार दाभोळकर , बंडू मोरे , अशोक गायकवाड , पंडित सोनवणे , नारायण गाडेकर , श्रीधर किनिकर , रितेश मदनवाड , राघवेंद्र कुलकर्णी , सुमित झंवर , रोहन हाळनोर , राहुल हाळनोर , प्रसन्ना कुलकर्णी , ज्येष्ठ नागरिक डॉ. प्रल्हाद जठार , राधे राधे अग्रवाल , बालाप्रसाद झंवर , चलवदे काका , मोहन व्यवहारे , कुलकर्णी , कोळपकर , त्याचप्रमाणे प्रज्ञा जठार , सापर्णा चिंतलवार , सविता हाळनोर , अश्विनी जाहागिरदार , सुलोचना मगारे , दिपाली श्रीखंडे , मंगलाताई घाडगे , केतकी हाळनोर , निकम ताई म.न.पा. स्वच्छता कामगार ज्ञानेश्वर मुगदल , नारायण निकम , काशिनाथ जावळे , संजय बिरारे , किशोर रामटेके , विमल कारके , चंद्रकला जाधव , राणीची तूसांबड , धनपती लाहोट , त्याचप्रमाणे परिसरातील नागरिकांची मोठया प्रमाणावर उपस्थिती होती .