
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी देगलूर
संतोष मंनधरणे
देगलूर :- मुखेड तालुक्यातील येवती,बाऱ्हाळी , मुक्रमाबाद , परिसरात सागवान वृक्ष तोड जोमाने सुरू असुन असेच एक प्रकरणं बाऱ्हाळी परिसरातील निवळी येथे सापडले आहे.
उपवनसंरक्षक अमोल सातपुते साहेब, स.व.स ठाकूर साहेब यांच्याकडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून बाऱ्हाळी बिटातील मौजे निवळी येथे अवैधरित्या सागवानाची कत्तल करून चोरट्या मार्गाने काळ्या बाजारात विक्रीसाठी नेत असताना वनविभाग यांच्या कर्मचाऱ्याकडून छापा मारून अंदाजे 2-3 घनमीटर माल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे.
पुढील कायदेशीर कार्यवाही वनपरिमंडळ अधिकारी अभय सेवलकर वनरक्षक धम्मपाल सोनकांबळे करीत आहेत. सदर माल वनपरिक्षेत्र कार्यालयात आणण्यात आला.सदर कारवाईत वनपरिक्षेत्र अधिकारी श्री.एस. डी हराळ,वनपरिमंडळ अधिकारी ए. पी.सेवलकर श्री.एम.एम पवार वनरक्षक डी. डी सोनकांबळे, पी. एन शिरुरे, आर.के राठोड, ए. एन राठोड,आर.एन कराड,एम जी गोपुलवाड डी. एस घुगे व मेहबूब शेख यांचा समावेश होता.
सदर कारवाईत अंदाजित रक्कम 42000 ते 45000 रुपयांचा सागवान व ट्रॅक्टर अंदाजित किंमत 2 लाख हा मुद्देमाल जप्त करण्यात असुन यामुळे सागवान तस्करी करणाऱ्या टोळीवर थोड्याफार प्रमाणात का होईना जरब बसली आहे. बाराहाळी परिसरात चोरट्या मार्गाने सागवान तस्करी होत असल्याच्या गुप्त माहितीवरून सदर कारवाई करण्यात आली. वनविभाग अशाच प्रकारे सागवान तस्कर विरोधात नेहमी धडक मोहीम राबविल्यास निश्चितच सागवान तस्कर यावर आळा बसेल असे जनतेतून बोलले जात आहे.