
दैनिक चालु वार्ता
पिंपरी शहर प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पुणे :- खडकी येथील इंदिरा गांधी कल्याण केंद्राच्या वतीने प्रजकसत्ताक दिवस हा मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. तसेच या दिवशी महाराष्ट्रातील सव स्तरातील सामाजिक, राजकीय, आरोग्य, क्रीडा, पत्रकारिता, शिक्षक इत्यादीं क्षेत्रातील मान्यवरांना खडकी भूषण पुरस्कार (२०२२) देऊन सन्मानित करण्यात आले.
दरम्यान इंदिरा गांधी कल्याण केंद्र हि गेली ३४ वर्षा पासून सर्व महाराष्ट्रातील सर्व स्तरातील व्यक्तींचा २६ जानेवारी व १५ ऑगस्ट रोजी स्मृती चिन्ह देऊन गौरव करीत असते.
या वर्षीही आयपीएल चे क्रिकेटर रोहित त्रिपाठी यांच्या हस्ते तनिष्का गणेश कांबळे (बॉक्सर), उत्कृष्ट पत्रकार आरती मेस्त्री (सकाळ पेपर), राजेश माने ( पत्रकार), प्राजक्ता माने, ऋतुजा वाघमारे, महिमा गुप्ता (हॉकी), तसेच भूषण खंदारे (फेम ये वेड्या), बाळासाहेब तायडे (गायक), सोहिल नवी कुरेशी (कलाकार), रुपेश शेलार (फेम वाघेर्या ) यांच्या सह विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या दिग्गज मान्यवरांना सन्मान चिन्ह देऊन, गौरव करण्यात आला. यावेळी त्रिपाठी म्हणाले की, शिक्षणाबरोबर खेळ हि खेळले पाहिजे व परिसराचे व शहराचे नाव देशपातळीवर नेले पाहिजे.
तसेच मान्यवरांनी इंदिरा गांधी कल्याण केंद्राचे हि मनापासून आभार मानले. या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते. खडकी कॅंटोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष मनीष आनंद, बोर्डाचे सदस्य दुर्योधन भापकर, मुस्लिम बँकेचे संचालक मुनावर शेख, अंजुम इनामदार, अजी हुसेन तसेच या कार्यक्रमचे मुख्य आयोजक अजहर खान, इंदिरा गांधी कल्याण केंद्राचे पदाधिकारी समीर चौधरी, महेबूब पिरजादे, असण सय्यद, शहनावाज कुरेशी, शारुख शेख, जुबेर कुरेशी, मगदूम खान, जाफर चौधरी यांच्या सह इतर पदाधिकारी सदस्य, उपस्थित होते.