
दै.चालु वार्ता हा वृत्तपत्र मी नुकताच 26 जानेवारी अंक वाचला,व पी डी एफ प्रत वाचतो ग्रामीण भागातील सामाजिक, धार्मिक, राजकीय घडामोडींवर प्रकाश टाकण्याच काम दै चालू वार्ता या पेपर द्वारे केलं जातं तसेच,हा पेपर ग्रामीण भागातील प्रश्न सोडविण्यासाठी आपल्या भागातील लोकप्रतिनिधी समोर मांडण्याचं काम करत आहे. हा वृत्तपत्रमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना सुद्धा अभ्यास करण्याची संधी मिळते.
तसेच शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन मिळते बाजार भाव आम्हाला घरी बसून समजतो त्या पेपर चे वैशिष्ट्य म्हणजे दररोज दैनिक चालू वार्तावृत्तपत्र प्रतिनिधी पेठवडज बाजीराव गायकवाड द्वारे आम्हाला हा पेपर ग्रुपच्या माध्यमातून आमच्या पर्यंत पोहोचवतात व तळागाळातील गोरगरिबांचे प्रश्न सुद्धा त्या पेपर मुळे सुटलेले आम्हाला दिसून येतात असच तुमच्या दैनंदिन कार्य चालत राहो चालु वार्ता परिवाराचं आणि तुमची खूप प्रगती होवो कमी दिवसांमध्ये अतिशय उत्कृष्ट कार्य दैनिक चालू वार्ताचे संपादक डी एस लोखंडे साहेब व त्यांच्या टीमने केलेली आहे.
त्यांचं कार्य अभिनंदनास व कौतुकास पात्र आहे .ह्या पेपरची आवृत्ती मुद्रित आवृत्ती लवकरात लवकर आम्हाला मिळो हीच या निमित्ताने माझी प्रतिक्रिया आहे हा पेपर अतिशय सुंदर आहे.. असंच काम पुढे करत राहो हीच सदिच्छा धन्यवाद..
आपलाच:श्री. व्यंकटी गोविंदराव जाधव मु.सिरसी बु. ता. कंधार जि. नांदेड.