
दैनिक चालु वार्ता
नांदेड शहर उत्तर प्रतिनिधी
यानभुरे जयवंत
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यामार्फत राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती परीक्षा ( NMMS ) इ.स.2021 – 22 चे आयोजन इयत्ता आठवीच्या वर्गात शिकत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी रविवार दिनांक 10 एप्रिल 2022 रोजी करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांमधून प्रज्ञावान विद्यार्थी शोधण्याच्या दृष्टीने या परीक्षेचे महत्त्व अनन्यसाधारण आहे त्यासाठी इयत्ता आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक परीक्षा ( NMMS ) 2022 साठी आवेदन पत्रे भरावी असे आव्हान महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे – 1 चे आयुक्त एच.आय.आतार यांनी 19 जानेवारी 2022 च्या परी पत्रकाद्वारे केले आहे.
अवेदन पत्रे ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर http:/www.mscepune.in व http://nmmsmsce.in उपलब्ध करून दिले जाणार आहेत त्यासाठी ऑनलाइन पद्धतीने नियमित आवेदनपत्र भरण्यासाठी ची दिनांक 19 जानेवारी 2022 ते 19 फेब्रुवारी 2022 अशी असून आवेदन इस 100 रुपये आकारले आहे. 20 फेब्रुवारी 2022 ते 24 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये विलंब फिस भरण्यासाठी वेळ दिली यासाठी दोनशे रुपये पीस आकारण्यात येणार आहे तसेच 25 फेब्रुवारी 2022 ते 28 फेब्रुवारी 2022 या कालावधीमध्ये अतिविलंब शुल्क चारशे रुपये करण्यात येणार आहे.
इयत्ता आठवी वर्गात शिकत असलेल्या व खालील अटी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना व विद्यार्थिनींना या परीक्षेस बसता येणार आहे 1 ) पालकांचे वार्षिक उत्पन्न दीड लाखापेक्षा कमी असावे. 2 ) SC/ST शिक्षक च्या विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनीने इयत्ता सातवी वर्गात 50 % गुण घेऊन उत्तीर्ण झालेले असावेत व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना 55 टक्के गुण असावेत . या अटी पूर्ण करणारे विद्यार्थी या परीक्षेस पात्र होऊ शकतात. परंतु खालील शाळेत शिकणारे व शासनाचा लाभ घेणारे विद्यार्थी या परीक्षेस अपात्र ठरणार आहेत ते पुढील प्रमाणे 1 ) विनाअनुदानित शाळेत शिकणारे विद्यार्थी 2) जवाहर नवोदय विद्यालयात शिकणारे विद्यार्थी 3) केंद्रीय विद्यालय शिकणारे विद्यार्थी 4 ) सैनिकी शाळा मध्ये शिकणारे विद्यार्थी 5 ) शासकीय वस्तीग्रह च्या सवलतीचा, भोजन व्यवस्थेचा व शैक्षणिक सुविधांचा लाभ घेणारे विद्यार्थी वरील पाचही नियमात बसणारे विद्यार्थी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थी परीक्षा( एन.एम.एम.एस ) या परीक्षेपासून वंचित राहू शकतात.