
दैनिक चालु वार्ता
घूग्घूस प्रतिनिधी
प्रदिप मडावी
घूग्घूस :- शिवसेना जिल्हाप्रमुख मा.श्री.संदीप गिऱ्हे यांचा आदेशानुसार जिल्यातील औद्योगिक नगरी म्हणून घुग्गूस शहर प्रसिद्ध आहे.या नगरीत कामगारांचा मोठा भरणा आहे. सात वर्षाच्या दारू बंदी नंतर आता जिल्ह्यात रीतसर दारू विक्री सुरू झाल्याने शहरात देशी – विदेशी दारू धंद्याला उत आलेला आहे.शहरात आधी पासून जवळपास सतरा वाईन बार व तीन देशी दारू भट्टी असतांना विलास भिकाजी टेंभूणे संचालक में.चिर्यस प्रा.लि.उल्हासनगर जि. ठाणा यांच्या स्थलांतरित दुकानास नगर परिषदेने परवानगी दिली असून
सदर दुकान हे घुग्गूस येथील आनंद वाईन बारच्या बाजूला स्थलांतरित करण्यात येत आहे.
याठिकाणीच दहा ते पंधरा मीटर अंतरावर दिक्षा भूमी व भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा व स्मारक आहे.व तीस मीटर अंतरावर माता माऊलीचे मंदिर आहे.याच ठिकाणी आठवडी बाजार भरतो याच परिसरात नागरिकांसाठी प्रस्तावित बगीचा व वीस फुट रस्ता आहे.करिता सदर देशी दारूच्या विरोधात घुग्गूस सतिश बोंडे शिवसेनाप्रमुख यांनी विरोध दर्शविला आहे , दारू दुकानाला परवानगी देऊ नये याकरिता निवेदन देण्यात आले.असे असतांना ही सदर देशी दारू दुकानाला परवानगी देण्यात आली ती परवानगी रद्द करावी नाहीतर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले परवानगी रद्द न केल्यास शिवसेना पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ही दिला.याप्रसंगी घुग्गूस शिवसेना शहरप्रमुख सतिश बोंडे, उपतालुका प्रमुख गणेश शेंडे,चेतन बोबडे, सतिश गोहकार अन्य पदाधिकारी उपस्थित होते.