
दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधी / नरसिंग पेठकर
बारूळ :- २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी श्री शिवाजी माध्यमिक विद्यालय बारूळ येथे भेट दिली. प्रजासत्ताक दिनानिमित्त भाई डॉ. केशवराव धोंडगे साहेबाच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त व आजादी के अमृत महोत्सवानिमित्त विद्यालयात नवीन वेगवेगळ्या उपक्रमाची पाहणी केली. प्रा. राहुल वाघमारे यांनी यांच्या संकल्पनेतून साकारलेले डॉ. भाई केशवराव धोंडगे साहेबांचे व्यक्ती चित्रांचे सुंदर रेखाटन केले.
पि.जी. मेहकरकर यांनी उत्कृष्ट फलक लेखनात तिरंगा ध्वजासह प्रजासत्ताक दिनाच्या दिलेल्या शुभेच्छा. प्रा. टि. एस. चौधरे यांनी आयोजित केलेल्या स्पर्धा परीक्षा. त्याच बरोबर विद्यालयातील वृक्षाच्या लागवडी बद्दल व त्यांच्या रंगरंगोटी बद्दल महेत्रे बी.के. तसेच शाळेतील उपक्रमांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धी दिल्याबद्दल प्रदीप सूर्यवंशी या सर्वांचे प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे यांनी अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या.
या बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे म्हणाले की, विद्यालयात येताच मला इथलं प्रसन्न आणि आनंदी वातावरण पाहून मी खूप आनंदी झालो. हे सर्व वातावरण तयार करण्यासाठी ज्यांनी-ज्यांनी परिश्रम घेतले त्या सर्वांचे मी मनापासून कौतुक करून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच याबरोबरच सर्व शिक्षक बांधवांनी आपल्या चारित्र्या जपले पाहिजे. व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच प्रयत्नशील असले पाहिजे असे विचार व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी प्रा. डॉ. पुरुषोत्तम धोंडगे प्रा. चिवडे प्रा. गरुडकर प्रा. सुभाष वाघमारे मुख्याध्यापक अनिल वट्टमवार, उपमुख्याध्यापक बी.एम. बसवंते पर्यवेक्षक पि.आर. कुंडगीर, प्रा. गरुडकर प्रा. अरुण कौसल्या प्रा. कुंभारगावे प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संघपाल वाघमारे व प्राध्यापक शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.