
दैनिक चालु वार्ता
जव्हार प्रतिनिधी
दिपक काकरा
जव्हार :- ‘पाणी आडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून तालुक्यातील वडोली गावातील आदिवासी तरुणाईने आपल्या श्रमदानातून वनराई बंधाऱ्याची निर्मिती केली असून या मध्ये सामाजिक कार्यकर्ते दिपक गावंढा यांच्या पुढाकाराने व गावातील तरुण तसेच नागरिकांनी एकत्रित येऊन सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये माती भरून नदीवर बंधारा बांधून वाहणारे पाणी अडविण्याचा या तरुणाईने प्रयत्न केला.
तालुक्यातील अनेक गावामध्ये पाणीटंचाई सुरवात होण्याच्या मार्गावर असताना तरुणाईने बांधलेल्या या बंधाऱ्यात साठलेले पाणी हे अंघोळी,शेती,जनावरे पशु-पक्षी यांना या पाण्याचा उपयोग होणार असून”पाणी देई सर्वांना जीवदान.. पाणी अडवून करूया श्रेष्ठ काम”हा संकल्प घेऊन एक सामाजिक बांधिलकी म्हणून या वनराई बंधाऱ्यांची निर्मिती करण्यात आलेली आहे.या बंधाऱ्यात अडवण्यात आलेल्या पाण्याचा गावकऱ्यांना मोठा फायदा होणार असल्याने एक प्रकारे समाधान व्यक्त केले जात आहे.