
दैनिक चालु वार्ता
पिंपरी प्रतिनिधी
परमेश्वर वाव्हळ
पिंपरी :- सावित्रीबाई फुले स्मारक हॉल पिंपरी या ठिकाणी ‘ आम्ही भारतीय ‘या ग्रुपच्या वतीने “नामांतर लढयाकडून प्रजासत्ताक दिनाकडे”या कार्यक्रमाचे आयोजन प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या सुरवातीला प्रजासत्ताक दिन साजरा करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले. सदरील कार्यक्रम हा दोन सत्रात घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पॅंथर बाबासाहेब वडगावकर (कोल्हापूर) व विकास कदम ( जीएसटी अधिकारी पुणे) हे होते.
तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदाकिनी गायकवाड होत्या. यावेळी प्रथम सत्रात पॅंथर बाबासाहेब वडगावकर (कोल्हापूर),
विकास कदम (जीएसटी अधिकारी पुणे),कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंदाकिनी गायकवाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. व औरंगाबाद विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव मिळावे म्हणून अनेक वर्ष संघर्ष चालला यामध्ये अनेक पॅन्थर लढले, काही शहीद झाले. व यांच्या त्यागातून बलिदानातून अखेर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव औरंगाबाद विद्यापीठाला मिळाले. या लढाईत पिंपरी चिंचवड शहरातील अनेक पॅंथर सहभागी होते.
अशा पिंपरी चिंचवड शहरातील सुमारे १२० पॅंथरचा सन्मान करण्यात आला.यामध्ये अनेक पँथरला मरणोत्तर पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच दुसऱ्या सत्रात आंबेडकरी चळवळीतील पक्षांची येणाऱ्या महापालिका निवडणुकीतील भूमिका या विषयी चर्चासत्र ठेवण्यात आले. या चर्चा सत्रामध्ये आरपीआय (आठवले गट) राज्य महिला सरचिटणीस चंद्रकांता सोनकांबळे, वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष ,देवेंद्र तायडे,प्रहार जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष विनोद गायकवाड, एमआयएम पक्षाचे शहराध्यक्ष धम्मराज साळवे, रिपब्लिकन सेनेचे शहराध्यक्ष धुराजी शिंदे, बसपा शहराध्यक्ष सुरज गायकवाड,बिआरएसपी पुणे जिल्हाध्यक्ष धिरज बगाडे, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
आम्ही “भारतीय ग्रुप” च्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी “आम्ही भारतीय” ग्रुपचे विशाल कांबळे, विनोद गायकवाड,धम्मराज साळवे ,संतोष शिंदे,विजय ओहोळ,मनोज गजभार,ईश्वर कांबळे यांनी या कार्यक्रमासाठी विशेष मेहनत घेतली.