
दैनिक चालु वार्ता
शहादा प्रतिनिधी
क्रिष्णा गोणे
शहादा :- विद्यार्थ्यांच्या पंखांना भरारी देण्यासाठी, शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमलविण्यासाठी दि.२६ जानेवारी, २०२२ रोजी जि.प. शाळा, मनरद, ता.शहादा, जि.नंदुरबार येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.दीपक पाटील (उपसरपंच), श्री.जगदीश बागुल (मित्तल ग्रुप आफ्रिका) श्री.नितिन कोळी (संस्थापक अध्यक्ष टो.को. युवा मंच), श्री.गिरासे नाना( ग्रामसेवक), श्री.चंदू सोनवणे, श्री.पंकज कोळी, श्री.अक्षय भावसार, श्री.समाधान पाटील, सौ.वैशाली कुवर (शा.स.अध्यक्ष), श्री.सुनिल भील, श्री.सिताराम वळवी (शा.स.सदस्य) आणि देवरे मॅडम (उपशिक्षक) उपस्थित होते.
श्री.दीपक कुलकर्णी सर यांनी युवा मंचने आत्तापर्यंत राबविलेल्या कार्यक्रमाबद्दल सांगितले की, प्रत्येक व्यक्तीच्या मनात आपण समाज आणि देशासाठी काही तरी करावे, अशी इच्छा असते. टोकरे कोळी युवा मंचचे सामाजिक कार्य २०१६ पासून अविरत चालू असून गरीब व गरजू व्यक्तींची सेवा करत आहेत. आत्तापर्यंत विविध जिल्हा परिषद शाळा, अस्थिव्यंग शाळा तसेच निराधार मुलांना शैक्षणिक, क्रीडा व इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे वाटप केलेले आहे. पंतप्रधान निधी, मुख्यमंत्री निधी मिळवून देण्यासाठी सहकार्य करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आयोजित करणे, आदर्श विवाह सोहळा आयोजित करून अनिष्ट प्रथा बंद करणे, लग्न मंडपात रक्तदान करून व आहेर ऐवजी पाहुणे मंडळींना वृक्ष भेट देणे, रक्तदान शिबिरे आयोजित करणे, दिव्यांगांना मदत, वृक्षारोपण व संवर्धन करणे तसेच दिवसेंदिवस तरुण वर्ग हा व्यसनाधीनतेकडे वळलेला दिसत असल्याने त्यांचे प्रबोधन करण्यासाठी देखील गावोगावी जाऊन युवा मंचच्या माध्यमातून व्यसनमुक्ती प्रबोधनाचा कार्यक्रम घेत असतात.
तसेच तरुणांना पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन व स्पर्धा परीक्षेचे पुस्तके वाटप करण्यात आली आहेत. तसेच ‘गाव तेथे वाचनालय’ या उपक्रमाला देखील सुरुवात केली असून विविध ठिकाणी वाचनालय केलेली आहेत. असे विविधांगी स्तुत्य उपक्रम टोकरे कोळी युवा मंच राबवत असतात. रक्त मित्र नितीन कोळी (संस्थापक अध्यक्ष टो.को. युवा मंच) हे भगतसिंग रक्तदाता ग्रुपच्या माध्यमातून नियमित गरजू रुग्णांना रक्त मिळवून देत असतात. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.दीपक कुलकर्णी सर, मुख्याध्यापक यांनी केले. तसेच सौ.कविता सिसोदे मॅडम यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचा यशस्वितेसाठी मंचचे पदाधिकारी व सदस्य गणेश कोळी, योगेश कोळी, गोपाल कोळी, सचिन कोळी, भैय्यासाहेब कोळी, विजय कोळी, लोटन साळुंके, विकास कोळी, मनीष कोळी, मनोज कोळी, महेंद्र निकम, संदीप चव्हाण, विजय ठाकरे, किरण निकम, निलेश कोळी यांनी सहकार्य केले.