
दैनिक चालु वार्ता
कंधार प्रतिनिधी
माधव गोटमवाड
कंधार :- आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी कंधार शहराच्या विकासासाठी कंधार नगर पालीकेला पाच कोटी रूपयाचा निधी दिला होता.या निधीमुळे शहरातील विकास कामात भर पडणार होती. आमदारांनी दिलेल्या निधीतुन शहरात कोणती महत्त्वाची कामे करायची याचा नगर पालीकेच्या वतीने अंजेडा बनवण्यात आला होता.परंतु कोणतीच कल्पना न देता आमदारांनी हा निधी परत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीला वर्ग केला असल्याची माहीती आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली आहे. नगर पालीका कामे करण्यास विलंब करत असल्याने हा निधी वापस घेतला गेला असल्याचे कारण पुढे करण्यात आले आहे.भविष्यात कंधार नगर पालिकेला निधी देणार नसल्याचेही आमदारांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुकीच्या अगोदर आमदार हे माजी सनदी अधिकारी आहेत त्यांना विकासाची जाण आहे ते कंधारचाच नव्हे तर मतदार संघाचा विकास करतील अशी अपेक्षा जनतेला वाटत होती.म्हणून जनतेनी आ.शिंदे यांना भरभरुन मते देऊन विजयी केले.विजया नतंरही विकास कामात कोणतेच राजकारण करणार नसून मला, सर्व सारखेच आहेत फक्त विकास झाला पाहिजे हाच माझा हेतू असल्याची प्रतिक्रिया आमदार देत होते.आठ माहिन्यापुर्वी कंधार शहराच्या विकासाठी आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी पाच कोटी निधी दिला होता.
परंतू हा निधी त्यांनी परत घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीला निधी वर्ग केला असल्याने पुन्हा वाद निर्माण झाला आहे.कंधार शहराच्या विकासाठी खुप निधी येत आहे परंतू पुढाऱ्यांना शहराचा विकास होऊ द्यायचा नाही हेच वास्तव आहे.आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी शहराच्या विकासासाठी पाच कोटी निधी दिला असल्याने शहरातील अनेक रस्त्याचे व इतर कामे होणार होती.परंतू नगर पालीका कामे करण्यास विलंब करत असल्याचे कारण पुढे करुन हा निधी परत घेतला असल्याने कंधारकरांचा हिरमोड झाला आहे.
नगरपालीकेच्या वतीने लागणाऱ्या सर्व कागद पत्रांची पुर्तता केली जात होती यासाठी लागणारे पैसेही नगरपालीकेने खर्च केले आहेत.परंतु कोणतेच कारण न सांगता हा निधी परत घेतला गेला आहे.हा निधी परत घेण्यासाठी आमदार मोहदयानी घाई का केली असा प्रश्न निर्माण होत आहे.नगराध्यक्ष व आमदारांत कामे कोणी करायची याची धुसपुस होती .परंतु शहराच्या विकासासाठी एवढा निधी वर्ग करणे ही शोकांतीकांच आहे.आमदार मोहदयानी हा निधी नगरपालीकेकडून परत घेतला यात काही हरकत नव्हती परंतु सदरील ठरलेले कामे किमान सार्वजनिक बांधकाम विभागा कडून घेतले असते तर काय वावगे ठरले असते.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील कामाची आता खरच गरज होती का असा सवाल केला जात आहे.. या पुढे कंधार नगर पालिकेला निधी देणार नसुन लोहा नगरपालीकेला देवू अशी प्रतिक्रिया आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली आहे.या प्रतिक्रियेमुळे सोशल मिडियातुन टिका होत असुन आमदार मोहदयाना शहरातील जनतेनी मतदान केले नाही का असा सवाल केला जात आहे.त्यामुळे पुन्हा कंधार करांचा हिरमोड झाला आहे.
आमदार हे चुकीचे बोलत असुन नगरपालीकेने कोणताच विलंब केला नाही.मुळात पाच कोटी रूपयांचा निधी आला हेच दोन महिने आमदारांना माहीत नव्हते.आम्ही सांगितल्यावर त्यांना निधी आल्याचे माहीत झाले.नगर पालीकेच्या वतीने कामा संदर्भात सर्व प्रक्रीया पुर्ण झाल्या होत्या परंतु कोणतीच सुचना न देता आमदारांनी हा निधी परत घेतला आहे.या संदर्भात मी आमदाराना फोन केला परंतु त्यांनी उचलला नाही.
आशाताई यांना ही फोन करुन बोललो त्यांनी ही उडवाउडवीची उत्तरे दिले.नगरपालीकेला निधी देणार नसाल तर हरकत नाही परंतु ठरलेली कामे रद्द करु नक्का ती सार्वजनिक बांधकाम विभागा कडून करुन घ्या अशी सुचना व्हाट्सअप वर होती.निधी द्यायचा का नाही हा प्रश्न आमदारांचा आहे .ते निधी देत नसतील तर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे जाऊ अशी प्रतिक्रिया नगरसेवक शहाजी नळगे यांनी दिली आहे..
नगर पालीकेला निधी येऊन आठ महीने झाले असतानाही कामे चालु केल्या जात नव्हती .म्हणून हा निधी मी परत घेतला आहे.यात शहाजी नळगेची 100% चुक आहे.निधी वापस घेतला म्हणजे मी काही माझ्या शेताच्या कामाला नेला नाही.तो शहरातच खर्च केला जाणार असून कृषी उत्पन्न बाजार समितीला वर्ग करण्यात आला आहे.या निधीतून शहरातीलच कामे होणार आहेत.यानंतर कंधार नगरपालीकेला मी निधी देणार नाही.पुढच्या वर्षी लोहा नगरपालीकेला निधी देवु अशी प्रतिक्रिया आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी दिली. शिंदे यांनी नगरपालीकेला दिलेला पाच कोटी निधी घेतला परत..!