
दैनिक चालु वार्ता
गंगापूर प्रतिनिधी
सुनिल झिंजूर्डे पाटिल
बच्चूभाऊ ओ बच्चूभाऊ, बच्चूभाऊ ओ बच्चूभाऊ,
तुमचा डंका दाही दिशात,तुमची ख्याती किती गाऊ
तुमची छबी जनमानसात,तुमची कीर्ती किती गाऊ
बच्चूभाऊ ओ, बच्चूभाऊ,बच्चूभाऊ ओ बच्चूभाऊ||धृ||
बच्चूभाऊ ओ बच्चूभाऊ,बच्चूभाऊ ओ बच्चूभाऊ
तुमची ख्याती कीर्ती किती गाऊ …बच्चूभाऊ
सत्य,न्याय,हक्कासाठी भाऊ तुमचा ‘प्रहार’
अधिकाऱ्यांना शिकवता तुम्ही खरा अधिकार
बच्चू ‘स्टाईलने’ टाकता भ्रष्टाचाऱ्यांवर धाड
सामान्य जनतेची संघटना निर्भिड भाऊ ‘प्रहार’
राजकारणाचा नाही तुम्हाला स्वार्थी विकार
लहान,तरुण,मोठे करतात तुमचा प्रचार-प्रसार
घरोघरी,दारोदारी तुमचा जयघोष जयजयकार
तुमच्या नावाचा दरारा, गुणगान किती गाऊ
कार्यकर्त्यांचे तुम्ही जीवप्राण,आन-बान शान
सारे प्रेमाने म्हणतात,अपनाभिडू बच्चूकडू,बच्चूभाऊ||१||
रक्तदानाचे तुमचे कार्य दिव्य, भव्य, महान
शेतकऱ्यांचा तुम्ही जपला सार्थ स्वाभिमान
दीन-दुबळे,अपंगासाठी तुमचा शब्द रामबाण
भाऊ तुम्हाला आपुलकी,माणुसकीची जाण
तुम्ही गुणीजनांचा राखता सदा मान-सन्मान
सुसंवाद साधता सर्वांशी मोठा असो वा सान
तुमच्या बेधडक कार्याचा लोकांना अभिमान
तुम्हाला लाभले नैसर्गिक वक्तृत्वाचे वरदान
कार्यकर्त्यांचे तुम्ही जीवप्राण,आन-बान शान
सारे प्रेमाने म्हणतात,अपनाभिडू बच्चूकडू,बच्चूभाऊ||२||
जनतेच्या प्रश्न,समस्येसाठी उपोषण,आंदोलन,मोर्चा
छत्तीस जिल्ह्यात,गल्ली,दिल्लीत तुमचीच भाऊ चर्चा
तुमचे नाव ऐकताच झोंबतात भ्रष्टाचाऱ्यांना मिरच्या
‘प्रहारा’ने बदलतात आमदार,खासदार,मंत्र्यांच्या खुर्च्या
सदैव धावून येता तुम्ही भाऊ मदतीला शेतकऱ्यांच्या
कामासाठी झटता नेहमी कष्टकरी,कामगार,मजुरांच्या
सलाम,प्रणाम कोटी कोटी भाऊ सद् कार्याला तुमच्या
सामान्य माणसांचे मिळतात तुम्हाला आशीर्वाद,शुभेच्छा
कार्यकर्त्यांचे तुम्ही जीवप्राण,आन-बान शान
सारे प्रेमाने म्हणतात,अपनाभिडू बच्चूकडू,बच्चूभाऊ||३||
©गीत: कृष्णा विष्णू गाडेकर
जिल्हाध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना औरंगाबाद
रा.गिरसावळी ता.फुलंब्री
जिल्हा. औरंगाबाद
मो.9764040111 / 7262969341