
दैनिक चालु वार्ता
नंदुरबार प्रतिनिधी
संदिप मोरे
नंदुरबार :- तालुक्यातील नंदुरबार-निझर रस्त्यावरील पथराई फाट्याजवळ प्रतिबंधीत विमलगुटखा व तंबाखुची वाहतुक करणारे दोन पिकअप वाहने पकडुन ३५ लाखाचा गुटखासाठा व दोन वाहने असा ४५ लाखाचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई पहाटेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी दोन चालकांसह माल विक्री व खरेदी करणाऱ्या तीन अशा एकुण पाच जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षकांचे व नंदुरबार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी संयुक्तरित्या केली.
नंदुरबार तालुक्यातील नंदुरबार ते निझर रस्त्याने महाराष्ट्र प्रतिबंधीत असलेला गुटखासाठा पिकअप वाहनांमध्ये भरुन गुजरातहुन नंदुरबारकडे वाहतुक करण्यात येत होता. नंदुरबार तालुक्यातील पथराई फाट्याजवळ नाशिक परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथक व नंदुरबार एलसीबीचे पथक यांनी संयुक्तरित्या सापळा रचला. दि.२७ जानेवारी रोजी पहाटे ५ वाजेदरम्यान पथराई फाट्याजवळ निझरकडुन नंदुरबारमार्गे धुळ्याकडे दोन पिकअप वाहने (क्र.एम.एच.३९ सी.९२८९) व (क्र.एम.एच.४८ वाय.ए.६३५०) येत होती.
यावेळी पोलीसांनी दोन्ही वाहनांना थांबवुन विचारपूस केल्यावर चालकाने उडवाउडवीची उत्तरे दिली तर एक चालक पोलीस पाहताच पसार झाला. पोलीसांनी वाहनांची झाडाझडती घेतली असता विमल पानमसाला गुटखा व तंबाखुचे भरलेले पोते मिळुन आले. पिकअप वाहन (क्र.एम.एच.३९ सी.९२८९) मध्ये १ लाख १८ हजार ८०० रुपये किंमतीचे तीन खाकी रंगाच्या मोठ्या गोण्या त्यात विमल पानमसाला, बोलोजुबा केसरी असलेला गुटखासाठा, १३ हजार २०० रुपये किंमतीचा व्ही.-१ तंबाखुसाठा १३ लाख ८३ हजार ८०० रुपये किंमतीचा विमल पानमसाला गुटखासाठा, २ लाख ४४ हजार २०० रुपये किंमतीचा व्ही-१ तंबाखुसाठा तसेच पिकअप वाहनामध्ये (क्र.एम.एच.४८ ए.वाय.६३५०) १४ लाख ९६ हजार रुपये किंमतीचा विमल पानमसाला गुटख्याची ४० गोण्या, २ लाख ६४ हजार रुपये किंमतीचे व्ही-१ तंबाखुच्या ४० गोण्या असा एकुण ३५ लाख २० हजार रुपये किंमतीचा गुटखासाठा जप्त केला आहे. तसेच १० लाखाची दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहे.
याबाबत नाशिक परीक्षेत्र विशेष पोलीस महानिरीक्षक पथकातील सहाय्यक फौजदार बशीर गुलाब तडवी यांनी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पिकअप चालक छोटु रमेश भिल, पिकअप चालक शाहरुख पुर्ण नाव माहित नाही व गुजरात राज्य हद्दीतील गोडावुनमधुन गुटखा विक्री करणारे धर्मेश घनशामदास हासाणी (रा.नंदुरबार) आणि गुटखासाठा विकत घेणारे विक्की महादेव परदेशी,एकनाथ (बाळु) भालचंद्र पाटील (रा.धुळे) या पाच जणांविरुध्द भादंवि कलम ३२८, २७२, २७३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोसई. यादव भदाने करीत आहेत.
ही कारवाई सदरची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र नाशिक डॉ. बी.जी.शेखर पाटील, पोलीस अधिक्षक श्री.पी.आर.पाटील, अपर पोलीस अधिक्षक विजय पवार यांचे मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकातील पोलीस निरीक्षक बापु रोहम, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, सहा. पोलीस निरीक्षक संदीप पाटील, विशेष पोलीस पथकातील सहा. पोलीस निरीक्षक श सचिन जाधव, असई.बशिर तडवी,पोह सचिन धारणकर, रामचंद्र बोरसे, पोना.प्रमोद मंडलीक, कुणाल मराठे, मनोज दुसाणे, सुरेश टोगारे व स्थानिक गुन्हे शाखा नंदुरबार येथील पोह.दिपक गोरे, रमेश पाडवी, पोना.राकेश मोरे, पुरुषोत्तम सोनार, पोलीस अमंलदार.विजय ढिवरे, अभिमन्यु गावीत, दिपक न्हावी, अभय राजपुत, आनंदा मराठे यांनी केली असुन विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक डॉ. बी.जी. शेखर पाटील यांनी संपुर्ण पथकाचे अभिनंदन केले आहे.