
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- आज पर्यटन आणि पर्यावरण मंत्री ना. आदित्य ठाकरे यांच्याहस्ते सिल्लोड मधील भूमिगत गटार योजने अंतर्गत 65 कोटी रुपयांच्या मलनिस्सारण प्रकल्प टप्पा क्रमांक 1 मलशुद्धीकरण केंद्राच्या कामाचे भूमिपूजन मंत्री ना. आदित्यजी ठाकरे यांच्याहस्ते संपन्न झाले. यावेळी महसुल तथा ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार, माजी खा. चंद्रकांत खैरे, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेंद्र त्रिवेदी, आमदार अंबादास दानवे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस अधीक्षक निमित्त गोयल, सिल्लोडच्या नगराध्यक्षा राजश्री निकम, उपविभागीय अधिकारी संजीव मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार मराठे, तहसीलदार विक्रम राजपूत, जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अर्जुन पा. गाढे, माजी जि. प. उपाध्यक्ष केशवराव तायडे, जि.प. बांधकाम सभापती किशोर बलांडे, डॉ. संजय जामकर, युवासेना जिल्हाप्रमुख कैलास जाधव, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू राठोड, किशोर अग्रवाल, सुदर्शन अग्रवाल . शिवसेना तालुकाप्रमुख देविदास पा. लोखंडे, प्रभाकर आबा काळे (सोयगाव ) सिल्लोड शहरप्रमुख रघुनाथ घरमोडे, शेख इम्रान ( गुड्डू), धैर्यशील तायडे, शिवा टोम्पे, प्रवीण मिरकर आदींसह शिवसेना नगरसेवक, सरपंच तसेच शिवसेना – युवासेना पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.