
दैनिक चालु वार्ता
सिल्लोड प्रतिनिधी
सुशिल वडोदे
सिल्लोड :- मतदार दिनानिमित्त आयोजित विद्यापीठ स्तरीय स्पर्धेत इंद्रराज महाविद्यालयातील रासेयो स्वयंसेवक कहेकशा शेख हिने चित्रकला स्पर्धेत विभागातून तृतीय क्रमांक मिळविला. याबद्दल तिला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून प्रमाणपत्र व एक हजार रुपये बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. खा. उत्तमसिंग पवार व संस्थेचे सचिव अशोक देवरे, प्राचार्य डॉ. प्रमोद शर्मा, उपप्राचार्य डॉ. वेंकटेश लांब, डॉ. चंद्रशेखर काळे व रासेयो तालुका गटसमन्वयक चंद्रशेखर देवकाते यांनी विजेत्या स्वयंसेवकाचे अभिनंदन केले. या स्पर्धेसाठी महाविद्यालयातील रासेयो कार्यक्रमाधिकारी डॉ. मनीषा मुगळीकर, डॉ. अजित येळवंडे, प्रा. मनोज पालवे सहकार्यक्रमाधिकारी डॉ. सुचिता देशमुख, प्रा. दिलीप अग्रवाल, डॉ. कृष्णा नगरे यांनी स्पर्धेसाठी मार्गदर्शन केले. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.