
अल्पावधीतच अतिशय लोकप्रिय झालेले हे वृत्तपत्र वाचकांच्या हृदयापर्यंत पोहोचले आहे, कारण या वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेक गोष्टी ग्रामीण भागातील लोकांना घरी बसून वाचण्यास मिळत आहेत ,विद्यार्थ्यांना जनरल नॉलेज उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी आनंदी आहेत या वृत्तपत्रातून गाव ते देशात घडणार्या ताज्या घडामोडी,रोज वाचन करण्यास मिळत आहेत. वनस्पती विषयी माहिती तसेच शेतकरी बाजार भाव, सामाजिक शैक्षणिक लेख,कथा, कविता, चुटुकले, सूर्यास्त, सोने-चांदी बाजारभाव यांची माहिती दररोज मिळत आहे.
व्यवसायासाठी सवलतीच्या दरात आकर्षक जाहिराती करता येतात, अल्पावधीत खरोखरच हे वृत्तपत्र सर्वांचेच झालेले आहे,अशी भावना प्रत्येकात तयार झाली आहे. 26 जानेवारी रोजी हे वृत्तपत्र वाचन करण्यासाठी मुद्रित झाले आहे,त्यामुळे वाचक वर्ग फारच आनंदून गेला आहे, यापुढे गाव तेथे प्रतिनिधी ठेवून समाजातील चांगल्या गोष्टी,कथा, उखाणे,साहित्य, कोडे,यशस्वी महिलांच्या मुलाखती घेऊन व्यासपीठ मिळवून द्यावे, व आधुनिकतेची कास धरावी,
मा. संपादक डी.एस लोखंडे पाटील कंधारचे प्रतिनिधी मा. माधव गोटमवाड तसेंच सर्व टीमचे मी कौतुक करते व मनापासून आभार मानते, हे वृत्तपत्र थोड्या दिवसात यशाची उत्तुंग भरारी घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचावे,अशीअपेक्षा व्यक्त करते.
लेखिका
कल्याणी विठ्ठल बरसमवाड
सचिव विठूमाऊली बहुउद्देशीय प्रतिष्ठान खैरकावाडी ता. मुखेड जि.नांदेड