
दैनिक चालु वार्ता
नांदुरा तालुका प्रतिनिधी
किशोर वाकोडे.
नांदुरा :- देि.28 नांदुरा येथील गणी पेट्रोल पंप व मुंधडा पेट्रोल पंप या दोन्ही पेट्रोल पंपावरील विविध त्रुटींमुळे हे पंप सिल व्हावे,जिल्हा परिषद केदार येथील शाळेमध्ये ४ वर्षापासून वीज पुरवठा खंडित आहे तो त्वरित जोडून द्यावा यासोबत विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय विश्र्वगामी पत्रकार संघाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष किशोर इंगळे यांनी २५ जानेवारी पासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. तहसील कर्मचारी वारंवार पत्र घेऊन आल्यानंतर ही किशोर इंगळे यांचे समाधान न झाल्याने अधिकारी परत जात होते पण मनासारखे लिहून देत नव्हते.
यामुळे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाचे नांदुरा तालुकाध्यक्ष अमर रमेश पाटील व तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे यांनी तहसील पलीकडे जात उपविभागीय अधिकारी मलकापूर येथे जाऊन ही पूर्ण बाब एस.डी.ओ साहेबांच्या लक्षात आणून देऊन याबाबत तोडगा काढण्याची विनंती केली असता साहेबांनी नांदुरा तहसीलला आदेश देत उपोषण सोडवण्यास सांगितले.यानंतर तहसील अधिकारी यांनी उपोषणकर्ते यांच्या मनासारखे लेखी आश्वासन दिल्यानंतर हे उपोषण सुटले.
यावेळी तहसीलचे प्रभारी तहसीलदार तथा नायब तहसिलदार श्री चव्हाण साहेब,लिपिक सतीश उगले साहेब,शिवसेना तालुकाप्रमुख संतोष डिवरे,संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष नांदुरा तथा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघ तालुकाध्यक्ष नांदुरा अमर रमेश पाटील,तालुका उपाध्यक्ष योगेश धोटे,तालुका सचिव महेंद्र वानखडे,तालुका प्रसिध्दीप्रमुख प्रफुल्ल बिचारे,शहाराध्यक्ष देवेंद्र जयस्वाल,सुशील इंगळे,अरुण सुरवाडे व इतर सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.