
काल वर्धा शहराजवळ झालेल्या अपघातात सात मेडिकल students चं निधन झालं. It’s a huge loss for their parents and even for the nation. 7 budding doctors lost their lives. The vehicle was speeding. अपघात का झाला त्याचे वेगवेगळे आडाखे बांधले जाताहेत. कुणी म्हणतंय driver and passengers were drunk, कुणी सांगतंय some animal crossed the path आणि त्याला वाचवताना गाडी खाईत कोसळली. गाडीचा झालेला चकणाचुर बघितल्यावर अपघाताची भीषणता लक्षात येते.
जे झालंय त्यावर चर्चा करुन आता काहीच निष्पन्न होणार नाहीय.झालेला loss भरुन निघणार नाहीय किंवा आईवडिलांना त्यांची बाळं परत मिळणार नाहीत. पण असे सगळे प्रसंग अंतर्मुख व्हायला लावतात. आपण आपल्या पुढच्या पिढीला संस्कार देण्यात कुठं चुकतोय का? हा विचार सतत मनात येतो. थोडं आठवून बघा, आपण कॉलेज मधे शिकत असताना कधी late night parties, आईबाबांची permission न घेता पिकनिकला जाणं, त्यांच्याशी खोटं बोलणं, drinking, drugs, girlfriend, boyfriend, smooch ह्या गोष्टी आपल्या मनात पण आल्या होत्या?
पाश्च्यात्य संस्कृतीचं अनुकरण करतांना आपण त्यांच्यातल्या वाईट गोष्टींचंच उदात्तीकरण करत चाललोय असं तुम्हाला नाही वाटत. आजकाल तर मला खुपदा असं वाटतं की आपण आंधळेपणाने पाश्च्यात्य संस्कृती आपलिशी करतोय आणि ते अगदी डोळसपणे आपल्यातल्या चांगल्या गोष्टी शिकताहेत. By saying this l am not making a blanket statement. प्रत्येकच परदेशी लोकं वाईट आहेत असं नाही. त्यांच्याकडून त्यांचा शिस्तबध्दपणा, व्यवस्थितपणा, traffic sense, व्यक्तिस्वातंत्र्य हे सगळं शिकण्यासारखं आहे. मुळ म्हणजे as a parent which values we imbibe in our children is most important. They should realise the importance and value of money. That is most important. They should realise that this is *My parents’ hard earned money,* then they will never ever think about spending it on Nonsense things.
Drinks, Smoking, Drugs, Sexual freedom, ह्या सगळ्या गोष्टींनी आजच्या कॉलेज students चं जीवन व्यापुन टाकलंय. Social media पण आजकाल ह्याच सगळ्या गोष्टींचं उदात्तीकरण करतोय. Movies, Web series, TV serials काहीही बघा, कॉलेज life वर based असलं तर अभ्यास सोडुन ह्या सगळ्या गोष्टींवरच जास्त focus असतो आणि मग मुलं पण त्याचंच अनुकरण करतात. One more thing is doing rounds everywhere nowadays. FOMO ( fear of missing out). Fear of not being included in something. ह्यामुळे कितीतरी कोवळी मुलंमुली नको त्या गोष्टींच्या आहारी जाताहेत, व्यसनाधीन होताहेत. I feel as a parent we can make a lot of difference everywhere.
First thing make your children realise the value of money. घरात कितीही सुबत्ता असली तरीही तो पैसा कमावण्यासाठी तुम्ही किती जीवापाड मेहनत घेतली आहे त्याची जाणिव मुलांना कायम असायला हवी. आपल्या मराठीत एक म्हण आहे. ‘अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे’ हे अगदी खरे आहे जर जरुरीपेक्षा जास्त पैसा आणि सुबत्ता हातात आली तर मग आडमार्गाला जायला वेळ लागत नाही. जोपर्यंत मुलं आपल्या जवळ आहेत तोपर्यंत आपल्याला जमतील तेवढे चांगले संस्कार त्यांच्यावर करायचा प्रयत्न करा. मोठ्यांचा आदर करायला शिकवा. घरातले वादविवाद, भांडणं त्यांच्यापर्यंत पोहोचू देऊ नका, कोणाही मोठ्या व्यक्ती बद्दल वाईटसाईट त्यांच्यासमोर बोलू नका, आपल्या सासु सासऱ्यांचा आपल्याला राग आला तरी आपल्या मनातच ठेवा कारण ते त्यांचे आजी आजोबा आहेत.
देवावर विश्वास ठेवायला शिकवा. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना देवभोळं बनवा. Make them believe in the superpower. कुणीतरी आपल्या चांगल्या वाईट कर्मांचा हिशोब ठेवतोय ही गोष्ट त्यांच्या मनावर बिंबवा. आपल्या देशाचा इतिहास, संस्कृती खुप महान आहे. लहापणापासूनच गोष्टींच्या स्वरूपात त्यांना हे सगळं शिकवायचा प्रयत्न करा. हे सगळं मनात उतरलं तर मुलं आपोआपच सुसंस्कृत होतील. आजच्या काळात we all are busy in our profession. कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नसतो. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे घरी संस्कार द्यायला, गोष्टी सांगायला आजी आजोबा नसतात.
But whatever free time you are getting spend it with your kids. दिवसातला कमीतकमी एक तास तरी त्यांच्यासाठी ठेवा. त्यांच्या अभ्यासात, school activities, friend circle सगळ्यात intrest घ्या. Try to communicate with them. ती मुलं तुमच्या स्पर्शाची, थोड्या वेळाची भुकेली असतात. मी कुणाला व्याख्यान द्यायला किंवा ज्ञान द्यायला हे लिहीत नाहीय. पण कालच्या प्रसंगाने मन विषण्ण झालं. कुठेतरी हे सगळं थांबायला हवं असं वाटलं आणि हे आपण, आपली पिढी करु शकतो असं वाटलं. त्यात मी पण काही हातभार लावु शकते म्हणुन हा प्रपंच मांडला. कुणाला माझे विचार न पटल्यास क्षमस्व.