
दैनिक चालु वार्ता
लोहारा प्रतीनीधी
महेश गोरे
लोहारा :- जिल्हा परीषद तसेच मराठी माध्यमातील विद्यार्थीसंख्या टिकून राहावी व शिक्षकांची पदे कमी होऊ नयेत यासाठी मराठी शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारणे अत्यंत आवश्यक बनले होते. तथापि, शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे शिवधनुष्य पेलण्याऐवजी पालकांना इंग्रजी शाळांच्या धर्तीवर सेमी-इंग्रजी माध्यमाचे गाजर दाखवून विद्यार्थीसंख्या टिकवून ठेवण्याचे तकलादू प्रयत्न करण्यात येत आहेत.हाच धागा पकडुन उस्मानाबाद चे जिल्हाधीकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी जिल्हा परिषद शाळा मधून सेमी इंग्रजी बंद करण्याच्या निर्णयाचे गेल्या अनेक वर्षापासून बालकांचा त्यांच्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेण्याचा हक्क सेमी इंग्रजीच्या माध्यमातून आपण हिरावून घेत होतो.
ज्या बालकांना मातृभाषेचे ही पुरेसे ज्ञान अवगत नसते त्यांना त्या वयामध्ये तेच विषय दुसऱ्या भाषेमधून शिकणे हे नक्कीच कंटाळवाणे वाटत होते आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सेमी इंग्रजी शाळेसाठी जे नियम बनवले आहेत त्या नियमांची पूर्तता जिल्हा परिषद करत नसल्यामुळे सेमी इंग्रजी शिक्षणाचे तीन तेरा झाल्याचे आपल्याला लक्षात येतच आहे. माध्यमाचे नाव सेमी इंग्रजी पाठ्यपुस्तके मात्र पूर्णपणे इंग्रजीतून आणि शिकवणारे मराठी माध्यमाचे असा हा अजब कारभार सध्या महाराष्ट्राच्या शैक्षणिक विश्वात सुरु आहे.
मुळात सेमीइंग्रजी म्हणजे काय इंग्रजी माध्यमांच्या शाळांना टक्कर देण्यासाठी आणि जिल्हा परिषद शाळेमधील गळती थांबवण्यासाठी मध्यम स्वरूपाचा मार्ग सेमी इंग्रजी जिल्हा परिषद मधून शिकवण्याचा झालेला निर्णय आणि त्या निर्णय मधून विद्यार्थ्यांची मानसिक कुचंबणा हे कोणी लक्षातच घेतले नव्हते.
इंग्रजी माध्यमाची शाळा जवळ उपलब्ध नाही, किंवा असली तरी ती आर्थिकदृष्ट्या परडवणारी नाही म्हणून पालकांना सेमी इंग्रजी माध्यमाची शाळा हा पर्याय चांगला वाटत होता. तथापि, यातील अंतर्गत वास्तव समजून घेतल्यास हा पर्याय म्हणजे आजारापेक्षा इलाज भयंकर अशीच स्थिती समोर आली आहे. म्हणून पालकांचा हा भ्रम दूर होणे आवश्यक आहेच.
विद्यार्थ्यांसाठी शिक्षण महत्त्वाचे आहे माध्यम नाही. सेमी इंग्रजी शिकवण्यासाठी आपल्याकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे व तज्ञ शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक हानी हे विचारात घेऊनच जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाचे स्वागत करण्यात येत आहे.
“”प्रथमतः सेमी इंग्रजी हे माध्यम नाही, तर तो इंग्रजी माध्यम आणि मराठी माध्यम यातील मध्यम मार्ग आहे.उच्च माध्यमिक शिक्षण घेताना विद्यार्थ्यांना गणित आणि विज्ञान हे विषय इंग्रजीतून असतात ते शिकताना त्यांना केवळ माध्यम इंग्रजी आहे म्हणून त्या विषयांचे दडपण येऊ नये.
म्हणून प्राथमिक व माध्यमिक अवस्थेतच त्या विषयांची ओळख इंग्रजीतून व्हावी हा सेमी इंग्रजी चा उद्देश आहे. व माध्यम कुठले निवडायचे हा विद्यार्थ्यांचा ऐच्छिक विषय आहे.राहिला प्रश्न व्यवस्थेचा व सुविधांचा तर तो प्रशासनाने आणि राज्यकर्त्यांनी मार्गी लावायला हवा.म्हणजेच प्रशासन व शासन आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न करत आहे.कारण शिक्षण घेणे हा हक्क आहे आणि शिक्षण देणे ही जबाबदारी.”
:- रंजनाताई हासुरे
सामाजीक कार्यकर्त्या