
दैनिक चालु वार्ता
प्रदिप मडावी प्रतिनिधी
पोभूर्णा :- काॅग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संबंधी घृणास्पद उदगार काढुन अपमानास्पद केले त्यांचे वक्तव्य निंदनीय असल्याने त्यांच्या निषेधार्थ पोभुर्णा भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिनांक 25 जानेवारी रोजी तहसील कचेरीवरती एक दिवसाचे ठिय्या आंदोलन व घोषनेबाजी करीत तहसिलदार मार्फत एक निवेदन देऊन नाना पटोले यांच्या वरती गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
यावेळी भाजपचे महिला जिल्हा अध्यक्ष तथा सभापती पंचायत समिती पोभुर्णाचे अल्का आत्राम , पोभुर्णा नगरपंचायतचे नवनिर्वाचित नगरसेवक अजित मंगळगीरीवार पंचायत समिती सदस्य गंगाधर मडावी माजी उपसभापती तथा सदस्य विनोद देशमुख ईश्वर नैताम नंदकिशोर तुमलवार रूषी कोंटरंगे महेश रनदिवे अजय मस्के श्वेता वनकर इत्यादी सह अनेक भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.