
दैनिक चालु वार्ता
अमरावती प्रतिनिधी
श्रीकांत नाथे
अमरावती :- सर्वांगीण प्रगती साधण्यासाठी महिला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे.त्यामुळे नवतेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम विकास प्रकल्पात अनेक उपक्रम राबविण्यात येत आहेत.महिला भगिनींमध्ये कौशल्य विकासा बरोबरच उद्यमशीलतेचा विकास करण्यासाठी जिल्ह्यात ‘नवतेजस्विनी’ अंतर्गत नऊ ठिकाणी प्रशिक्षण व उत्पादन निर्मिती केंद्रे सुरू करण्यात येत आहेत असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.
तिवसा येथे महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र आणि सक्षम लोकसंचालित साधन केंद्रातर्फे रेडिमेड गारमेंट व एलईडी लाईट निर्मिती व प्रशिक्षण केंद्राचे उदघाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते झाले.त्यावेळी पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.जि.प.सभापती पूजा आमले,पं.स.सभापती शिल्पा हांडे,’माविम’चे सुनील सोसे व एमसीईडीचे प्रदीप इंगळे आदी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की महिलांना प्रगती साधण्यासाठी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण होणे आवश्यक आहे.त्या दृष्टीने नवतेजस्विनी उपक्रमाची आखणी केली.या उपक्रमातून अनेक महिलांना प्रशिक्षणाबरोबरच उद्यमशीलतेचाही विकास व्हायला मदत होईल.तिवसा येथे केंद्रासाठी आवश्यक मोठी जागा मिळवून देऊ,तसेच नांदगावपेठ मद्धे युनिट उभारण्यात येईल असे अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री ऍड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.
यावेळी बचत गटांच्या सदस्य महिला, प्रशिक्षक व नागरिक उपस्थित होते.