
दैनिक चालु वार्ता
सिडको नवीन नांदेड प्रतिनिधी
विक्रम खांडेकर
हडको :- हडको वाघाळा येथील मीरानगर या ठिकाणी आज दिनांक २७.०१.२०२२ रोजी दुपारी एक वाजता.नांदेड महानगरपालिकेच्या महापौर सौ जयश्री ताई निलेश पावडे यांचा मीरानगर हडको वाघाळा येथील महिला मंडळांनी हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमा प्रसंगी शाल, श्रीफळ, पुष्पहार व वान देऊन सत्कार केला. त्यावेळी सत्काराला उत्तर देताना त्या म्हणाल्या की सिडको हडको भागातील ज्या काही नागरी समस्या आहेत त्या मी प्राधान्याने सोडवण्याचा प्रयत्न करेल व येत्या काळात महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री व नांदेड चे पालकमंत्री मा.ना.अशोकराव चव्हाण साहेब यांनी नांदेड शहराचा विकास झपाट्याने केलेला आहे आणि नक्कीच ना.अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सिडकोचा ही विकास येत्या काळात नक्कीच होईल अशी अपेक्षा त्यानी व्यक्त केली.
सदरील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सिडको वाघाळा शहर ब्लॉक काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष देविदास पाटील कदम हे होते. तर व्यासपीठावर गोविंद घोगरे, सुदर्शन जाधव, पांडुरंग गायकवाड, गजानन वाघमारे, संभाजी गायकवाड भगवान जोगदंड, सुनील शिंदे, राजु गायकवाड आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी रोजगार व स्वयंरोजगार विभाग मराठवाडा उपाध्यक्ष प्रा. सुभाष वाघमारे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. भाग्यश्री वाघमारे, सौ. कविता गोरे,
सौ. पुनम घोगरे, सौ. मनीषा जाधव, सौ. पायल गायकवाड, सौ. संगीता वाघमारे, सौ. कमलबाई खांडरे, सौ. आशा गायकवाड, सौ. अर्चना गायकवाड, सौ. वनिता झुंजोरे यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन प्रा. शशिकांत हाटकर यांनी मानले.